किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे कुटुंबीय येणार=
पुणे, [२२ मार्च] – पंजाबच्या घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशातील अनेक महोत्सव तेथे एकवटत आहेत. म्हणजे तेथे पंढरीची वारीही पोहोचत आहे, पंजाबमधील वैशाखीही साजरी होत आहे आणि भांगडाही सुरू आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेलेले शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय येथे आगामी ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार्या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी येथे दिली.
देसडला म्हणाले की, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान बहुमूल्य आहे. सायमन कमिशनचा निषेध करताना लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिशांनी लाठीहल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी या त्रिमूर्तीने जॉन सॅडहर्स्ट या इंगज अधिकार्याचा वध केला. त्यामुळे त्यांना २३ मार्च रोजी फासावर चढविण्यात आले. त्या क्रांतिकारकांचे वंशज नामदेवांच्या मराठीला मुजरा करण्यासाठी येत आहेत. पंजाबमध्ये नामदेवांना मान जो आहे तोच भगतसिंग व सुखदेव यांच्या बरोबरीने आपल्या राजगुरूनगरच्या शिवराम हरी राजगुरू यांनाही आहे.
भगतसिंगाचे पुतणे सरदार कुलतारसिंग यांचा मुलगा किरणजितसिंग सहारणपूर येथून येणार आहे. सुखदेव यांचे नातू अनुज थापर उत्तर प्रदेशातून येणार आहेत. राजगुरू यांचा पुतण्या सत्यशील आणि स्नुषा आरती राजगुरू पुण्यातून संमेलनासाठी येणार आहेत.