किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा=
नाशिक, [२१ मार्च] – वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना येत्या १ एप्रिलपासून केंद्रीय मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज शनिवारी येथे केली.
राधामोहन सिंह यांनी शनिवारी राज्यातील गारपीटग्रस्त आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या क्षेत्रातील नुकसानीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी गारपीटग्रस्त तालुक्यांची पाहणी करण्यासाठी निफाड तालुक्याला भेट दिली.
गारपिटीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकर्यांना तातडीने मदत जारी करण्याचे निर्देश केंद्राने याआधीच राज्य सरकारला दिले होते. या व्यतिरिक्त केंद्रीय मदतीचे वाटप येत्या १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शेतकर्यांना वेळीच मदत करता यावी, या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती निधीच्या नियमात बदल करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. उत्पन्नावर आधारित विमा योजनेचीही फेररचना करण्यात येणार आहे. या दोन्ही विषयांसंबंधी केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
वादळी पाऊस आणि गारपिटीपासून द्राक्ष बागांचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाची आयात करावी लागणार आहे. या आयातीत अबकारी करात सवलत मिळावी, यासाठी वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा केली जाईल. शेतकर्यांकडून कर्ज माफीची मागणी होत आहे. याबाबतचा प्रस्ताव आपण अर्थ मंत्रालयाला पाठविणार आहो, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी राधामोहन सिंह यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री एकनाथ खडसे, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते.
एकनाथ खडसे म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकार मिळून प्रति हेक्टर २५ हजार रुपये इतकी मदत देणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त मदत असेल. शेतकर्यांना वीजबिलात सवलत देण्यात येईल, तसेच त्यांच्या मुलांना शुल्कही माफ करण्यात येईल.