किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, [२० मार्च] – विधान परिषदेच्या सभापतिपदासाठीची निवडणूक टाळण्यात सत्ताधारी भाजपाला अखेर यश आले आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली गेली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता इतर तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची सभापतिपदी निवड झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव पारित केल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या संबंधांत कमालीची कटुता निर्माण झाली होती. त्यामुळे सभापतिपदाच्या निवडणुकीतही ही कटुता कायम राहून ही निवडणूक रंगणार असे चित्र निर्माण झाले होते. तत्पूर्वी, शिवसेनेने कॉंग्रेसला सहकार्य मागितले होते. परंतु, हायकमांडने यास अनुकूलता दाखवली नाही. त्यामुळे कॉंग्रेस हतबल झाली होती. आवश्यक संख्या नसल्याने उमेदवार पडणार, हे निश्चित असल्याने कॉंग्रेसने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते. कॉंग्रेसकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनाही भूमिका ठरविण्यात मागे पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनीही सेना आणि कॉंग्रेस नेत्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्याने राष्ट्रवादीही हतबल झाली होती. या सर्व घडामोडींची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला आणि सभागृहाची परंपरा कायम राखण्याची विनंती केली. त्यानुसार कॉंग्रेस, शिवसेना व अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत आपापले उमेदवार मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रामराजे नाईक निंबाळकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.
यावेळी अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रामराजे यांना घराणेशाहीचा मोठा वारसा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव लाभला आहे. रामराजे यांनी पहिल्यापासूनच सर्वसामान्यांमध्ये काम केले. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास त्यांनी पाहिला आहे. उच्चविद्याविभूषित असलेल्या रामराजे यांच्या मार्गदर्शनाचा या सभागृहाला नक्कीच फायदा होईल.
विधान परिषदेतील सभागृह नेते एकनाथ खडसे म्हणाले की, एका राजघराण्यात जन्माला येऊनदेखील सर्वसामान्यांची ओळख बनलेले रामराजे नेहमीच गोरगरिबांच्या मदतीसाठी झटले. रामराजे हे एक संयमी नेतृत्व असून, त्यांच्यात सर्वांना सोबत घेऊन समस्या सोडविण्याची विशेष हातोटी आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, रामराजे यांनी राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात काम केले आहे. जसे शिवाजी महाराज रयतेच्या कल्याणासाठी झटले, तसेच रामराजेदेखील झटत आहेत. आता त्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी रामराजे यांनी वेळोवेळी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. आता लोकशाही आणखी मजबूत होण्यासाठी रामराजे यांच्या माध्यमातून मदतच होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे म्हणाले, आज पक्षीय मतमतांतरात गुरफटलेले असतानादेखील सभागृहातील सर्वच पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध केली.