किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.87° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, [२४ मार्च] – पोलिसांबरोबर संगनमत करून जर गुंतवणूकदार कंपन्या राज्यातील लोकांची फसवणूक करत असतील तर यापुढे संबधित कंपन्यांना मदत करणार्या पोलिसांवरही कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
केबीसी या कंपनीने राज्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणाची लक्षवेधी राजेश टोपे यांनी उपस्थित केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सदर घोषणा केली.
केबीसीसारख्या अनेक कंपन्या राज्यात आपले जाळे पसरवून आहेत. या कंपन्यांकडून बर्याचदा गुंतवणूकदारांची सर्रास फसवणूक होते. या कंपन्यांबरोबर पोलिस यंत्रणाही सहभागी असते, ही बाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसही लक्ष देत नाहीत, ही बाब गंभीर आहे. अशा घटना होत असतील तर कंपनीबरोबरच संगनमत करून कंपन्याना मदत करणार्या पोलिसांवरही कारवाई केली जाईल.
राज्यातील गुंतवणुकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणार्या केबीसी कंपनीचे संचालक भाऊराव चव्हाण यांना सिंगापुरातून भारतात कधी आणणार तसेच त्यांची मालमत्ता विकून गुंतवणुकदारांचे पैसे परत देणार का? या उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, चव्हाण हे सिंगापूरमध्ये असल्याची माहिती आपल्याला अनेकांकडून मिळाली. तसेच वर्तमानपत्रातूनही बर्याचदा प्रकाशीत झाली आहे. मात्र, या ऐकीव माहितीवर कुठलीही कारवाई करता येत नाही. त्यासाठी आमची यंत्रणा कसून तपास करीत असून, चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि इंटरपोलची मदत घेतली जात आहे.
केबीसी कंपनीच्या गैरकामांबाबत पोलिसांनी स्वत:हून या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चव्हाण याचा पासपोर्टही जप्त केला होता. मात्र, चव्हाण याने न्यायालयातून जामीन मिळविताना कोर्टाने त्याला पासपोर्ट देण्याचे निर्देश दिले होते. पासपोर्ट मिळताच चव्हाण याने तत्काळ अन्य देशात पलायन केल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
चव्हाणची संपत्ती जप्त करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. यातून आलेल्या पैशातून गुंतवणुकदारांचे पैसे परत देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.