किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=विदर्भ विकास महामंडळात ४९०० कोटीचा निधी अखर्चित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती=
मुंबई, [२७ मार्च] – भाजपा-सेना युती सरकारने विकास कामांना कात्री लावताना केवळ ७२०० कोटींचे बजेट मांडले, असा आरोप करणार्या कॉंग्रेसप्रणीत आघाडी सरकारने केलेला प्रकार यापेक्षाही भयंकर आहे. गेल्यावर्षी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ९२०० कोटींपैकी केवळ ५१०० कोटी रुपयेच खर्च केले होते, अशी ‘पोलखोल’ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्प फुगवून दाखवायचा आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसायची अशी आमची भूमिका नसून, जी तरतूद केली तेवढी खर्च करू, असा निर्धार आमचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे, असेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पी अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेवर उत्तर देताना महाजन बोलत होते. आमचे सरकार ७२०० कोटींपैकी प्रत्येक रुपया लोकांच्या कामांसाठी खर्च करेल, असेही महाजन म्हणाले. विदर्भ विकास महामंडळात ४९०० कोटींचा निधी पडून आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता व अन्य तांत्रिक बाबींमुळे त्याचा वापर होऊ शकलेला नाही. मात्र, आता तसे कोणत्याही निधीच्या बाबतीत होणार नाही, अशी ग्वाही देत लवकरच २२ कामांना मान्यता देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात नेमके किती टक्के सिंचन झाले आहे, याची सध्या माहिती उपलब्ध नाही. चितळे समितीच्या अध्यक्षतेखाली सिंचनाची टक्केवारी तपासण्यासाठी समिती नेमली होती. त्याचा अहवाल लवकरच उपलब्ध होईल. तीन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार ३२ लाख, ६० हजार हेक्टर क्षेत्र सिचिंत असल्याचे दिसून आले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमरावतीत कॅन्सर इस्पितळ : तावडे
अमरावतीमध्ये अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यासाठी सर्व बाबींचा विचार केला जात असून, विदर्भात कॅन्सर रुग्णांची संख्या पाहता अशा प्रकारच्या हॉस्पिटलची गरज होती. नागपूरच्या हॉस्पिटलवर पडणारा रुग्णांचा ताण पाहता अमरावतीचे रुग्णालय फायदेशीर ठरू शकेल. केंद्र सरकारच्या नियमानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास खूप अडचणी आहेत. त्यापेक्षा मध्यप्रदेशच्या धरतीवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रुग्णालय उभारण्याचा युती सरकारचा विचार आहे. यामुळे अधिक चांगले डॉक्टरही आपल्याला मिळतील, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागण्यांवरील चर्चेवर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.