किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=पक्षाचा तमाशा झाला=
मुंबई, [२८ मार्च] – आम आदमी पार्टीचा आता तमाशा झाला आहे, असा आरोप करीत प्रख्यात समाजसेविका आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी आज शनिवारी पक्षाला रामराम ठोकला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणार्या आप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्लीतील बैठकीत आज जे काही घडले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपण याच क्षणाला पक्षाचा राजीनामा देत आहे, असे मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आम आदमी पार्टीत राजकीय सिद्धांतांची पायमल्ली सुरू आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासोबत जे काही घडले, त्याचा मी तीव्र निषेध करते. आपमध्ये आता राजकीय तमाशा सुरू झाला आहे आणि मला हा प्रकार कदापि मान्य नाही. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या.
अशा प्रकारचा राजकीय तमाशा आम्ही इतर पक्षांमध्ये पाहिला आहे. पण, आपकडून ही अपेक्षाच नव्हती. यादव, भूषण आणि आनंद कुमार यांनी पक्ष मोठा करण्यात फार मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण, प्रत्येक समस्येवर तोडगा असतो. कुणी जर पक्ष किंवा नेतृत्वावर टीका करीत असेल, तर कोणतीही कारवाई होण्यापूर्वी चर्चा करण्याची गरज असते. मात्र, तसे काहीच घडले नाही. आज तर पक्षाची जी प्रतिमा देशासमोर आली आहे, ती निषेधार्ह अशीच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.