किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.87° से.
26.45°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=संधीचे सोने करून दाखवा : अरुण जेटली यांचा सल्ला=
वाराणसी, [२८ मार्च] – आम आदमी पार्टीत सध्या जो अंतर्गत कलह सुरू आहे, तो त्यांच्या अपरिपक्व राजकारणाचेच प्रतीक आहे, असा चिमटा काढतानाच, अशाप्रकारे लाथाळ्या करण्यापेक्षा या पक्षाने दिल्लीकरांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवायला हवे, असा सल्ला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे.
दिल्लीकरांनी मोठ्या अपेक्षेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला भरघोस मतदान केले. इतर राजकीय पक्षांपेक्षा हा पक्ष वेगळा असेल, अशीच दिल्लीकरांची धारणा होती. या पक्षातही इतके घाणेरडे राजकारण असेल, अशी अपेक्षा नागरिकांनी कधीच केली नव्हती. या पक्षातील राजकारण काही वेगळेच दिसून येत आहे. जेव्हा एक नेता बोलतोे, तेव्हा दुसरा नेता त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून स्टिंग करतो. अशा प्रकारच्या राजकारणाची कदाचितच कुणी अपेक्षा केली असावी, असे जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॉंगे्रस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनीही आपमधील अंतर्गत लाथाळ्यांवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, त्याच लोकांना आता आपमधील कलहामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या पक्षाने आधी आपली अंतर्गत घडी नीट बसवावी आणि दिल्लीकरांना दिलेल्या वचनांची शक्य तितक्या लवकर पूर्तता करावी, असे सिंघवी आपमध्ये शनिवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही आपवर टीका करताना, इतर राजकीय पक्षांपेक्षाही या पक्षातील राजकारण घाणेरडे आहे, असे सांगितले.