किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.97° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.97° से.
26.87°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.85°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल= ‘आप’कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी व आरोप प्रत्यारोप=
नवी दिल्ली, [२८ मार्च] – अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचा दावा करून अभूतपूर्व जनादेशासह राजधानी दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज शनिवारी झालेल्या वादळी बैठकीत पक्षाचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची राष्ट्रीय परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली. बैठकीत आम्हाला बोलू देण्यात आले नाही, समर्थकांना मारहाण करण्यात आली, ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी बैठकीनंतर केला आहे. यामुळे आपमध्ये उभी फूट पडणार या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले.
आपच्या पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारची बैठक अनेक नाट्यपूर्ण घटनाक्रमाने गाजली. या घडामोडींमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनाक्रमाने व्यथित होत मेधा पाटकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. योगेेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी शुक्रवारी पत्रपरिषद घेऊन केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांची वागणूक मनमानी, तसेच हुकूमशाहीची असल्याचा आरोपही या नेेत्यांनी केला होता. केजरीवालविरोधी गटाने शुक्रवारी त्यांचे स्टिंग असलेली सीडी जाहीर करून प्रचंड खळबळ उडवली होती. आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना केजरीवाल शिवीगाळ करीत असल्याच्या या सीडीमुळे आपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची गुडगावजवळील कापसखेडा येथे होणारी ही बैठक वादळी ठरणार आणि त्यात योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, प्रो. आनंद कुमार आणि अजित झा या चौघांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव येणार हे नक्की होते.
या बैठकीसाठी केजरीवाल समर्थक आणि विरोधकांनी जोरदार तयारी केली होती. बैठकीसाठी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण आपल्या समर्थकांसह येत असताना त्यांना प्रचंड विरोध करण्यात येेऊन घोषणाबाजीही करण्यात आली. यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थकांनीही त्याला प्रत्युत्तर दिल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. केजरीवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजू आक्रमक झाल्या होत्या. एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. बहुमतात असलेल्या केजरीवाल यांच्या समर्थकांनी अल्पमतात असलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या समर्थकांना मारहाणही केली. या दोघांनाही धक्काबुक्की करण्यात आली. रमजान चौधरी नावाच्या कार्यकर्त्याला केजरीवाल समर्थकांनी मारहाण केली. या गोंधळातच चारही नेत्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मांडला. विशेष म्हणजे हा ठराव पारित होण्यापूर्वीच केजरीवाल यांनी बैठकीचे स्थळ सोडले होते. तत्पूर्वी त्यांनी बैठकीत भावनात्मक भाषण करून सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. केजरीवाल निघून गेल्यानंतर बैठकीचे अध्यक्षस्थान दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी भूषविले. यादव आणि प्रशांत भूषण यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने २४७, तर विरोधात ८ मते पडली.
बैठकीत गुंडांना बोलावण्यात आले होते, त्यांनी आमच्या समर्थकांना मारहाण केली, असा आरोप यादव आणि भूषण यांनी नंतर पत्रपरिषदेत केला. बैठकीत आम्हाला बाजू मांडण्याची संधी नाकारण्यात आली, गुंडागर्दी करण्यात आली, मात्र आम्ही कोणत्याही स्थितीत पक्ष तोडणार नाही आणि सोडणारही नाही, असा पुनरुच्चार दोघांनी केला. हकालपट्टीच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीतील आजचा हिंसाचार पूर्वनियोजित होता, केजरीवाल यांच्या समर्थकांनीच तो घडवल्याचा आरोप या दोघांनी केला.
आपतर्फे संजयसिंह आणि आशुतोष यांनी या आरोपांचे खंडन केले. बैठकीत हाणामारी झाल्याचेही त्यांनी नाकारले. यादव आणि प्रशांत भूषण या दोघांनी निवडणुकीत पक्षाचा पराभव व्हावा यासाठी भरपूर प्रयत्न केले, केजरीवाल यांच्या विरोधातील स्टिंग या दोघांचा कट आहे, असा आरोप आशुतोष यांनी केला. या घडामोडींमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, हे त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची यापूर्वीच आपच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली आहे. आज त्यांच्यासह चौघांना राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हाकलण्यात आले. त्यामुळे आता आपमध्ये पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.