किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.38°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=नवा व्हिडीओ जारी=
नवी दिल्ली, [२९ मार्च] – स्टिंगच्या माध्यमातून इतर राजकीय पक्षांची शिकार करणार्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल स्वत:च स्वकियांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चांगलेच अडकले आहेत. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना केजरीवाल शिवीगाळ करीत असल्याचा नवा स्टिंग व्हिडीओ आता बाहेर आला आहे. आपल्याच लोकांनी आपल्याला धोका दिला, अशा लोकांना बाहेरचाच रस्ता दाखवायला हवा, असे ते या व्हिडीओत सांगत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, हा व्हिडीओ आज रविवारचाच आहे. यात केजरीवाल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करीत आहेत. यात त्यांनी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना शिवीगाळ करताना आपण त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही नेत्यांवर जोरदार हल्ला करताना केजरीवाल यांनी भाजपा आणि कॉंगे्रसवरही आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
हा व्हिडीओ अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. अर्थातच या व्हिडीओला अधूनमधून कात्री लावण्यात आली आहे. यात केजरीवाल आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक तर दिसतात. पण, समोर उपस्थित असलेले लोक दिसत नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणीत नेत्यांना मारपीट करण्यात आली असतानाही, व्हिडीओमधून मारहाणीचे दृश्य कापण्यात आले आहे. केजरीवालांच्या जवळचे लोक मात्र या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन करीत आहेत. बैठकीत मारहाण झालीच नाही, असा त्यांचा दावा आहे. तर, पक्षाचेच आमदार देवेंद्र सहरावत, पंकज पुष्कर आणि आपचे पंजाबमधील खासदार धर्मवीर गांधी यांनी बैठकीत जोरदार गोंधळ झाला होता आणि काही नेत्यांना बौन्सरकडून मारहाण करण्यात आली होती, असा दावा केला आहे.