किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.28°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश– एनआयएने जप्त केले दोन मजले,
नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) पुण्यातील शालेय इमारतीचा भाग वापरला जात होता. हा भाग जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने सोमवारी दिली.
पुण्यातील ब्ल्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला रविवारी जप्त करण्यात आला. या परिसरात पीएफआय मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देत होती. २०४७ पर्यंत देशात इस्लामी सत्ता स्थापन करण्यास विरोध करणार्यांवर शस्त्रास्त्रांनी तसेच शस्त्रे नसताना हल्ले चढवून त्यांना ठार मारण्याचे प्रशिक्षण येथे दिले जात होते, असे एनआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मागील वर्षी २२ सप्टेंबरला एनआयएने पुण्यातील शाळेतील या दोन मजल्यांची झडती घेतली होती तसेच येथे कागदपत्रेही जप्त केली होती.
या कागदपत्रांच्या मजकुरातील अभ्यास केल्यानंतर रविवारी एनआयएने ही कारवाई केली होती. या कागदपत्रांतूनच पीएफआय मुस्लिम तरुणांना शस्त्राचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले आहे. पीएफआय ही देशातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करीत होती. येथे आयोजित केली गेलेली प्रशिक्षण शिबिरे मुस्लिम तरुणांना सरकार तसेच विशिष्ट समुदायाचे नेते किंवा संघटना यांच्याविरुद्ध भडकावण्याचे व्यासपीठ म्हणून काम करतात.