किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, (१६ एप्रिल) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रेय नारायण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि डॉ. धर्माधिकारी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यासोबतच परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला हा पुरस्कार साहित्य, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना दिला जात होता, परंतु नंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्येही हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्याला रवाना होतील, जिथे ते भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतील आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करतील.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाची क्षणचित्रे
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवात जय सद्गुरू म्हणत केल्यावर श्री सदस्यांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या, 30 लाखांपेक्षा अधिक श्री सदस्य शिस्तबद्ध रितीने बसून होते, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील आपल्या परिवारासह सर्वसामान्य श्री सदस्यांसारखे गर्दीत उन्हात बसून कार्यक्रम पाहत होते. कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशातूनही भाविक या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा आढावा
– श्रीमत दासबोधाच्या निरुपणातून समाज घडवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
– त्यांच्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची दखल संपूर्ण जगातून घेण्यात आली आहे.
– अंधश्रद्धेवर प्रहार, व्यसनमुक्ती, लोकशिक्षण यावर त्यांनी कायम भर दिला.
– स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव, वाड्या, शहर स्वच्छ करण्याचा दैनंदिन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
– त्यांचे समाजाप्रती असलेले काम पाहून भारत सरकारने याआधी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.