किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.53° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.53° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल– आप्पासाहेब धर्माधिकारी हळहळले,
मुंबई, (१७ एप्रिल) – महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सर्व श्री सदस्य हे माझे कुटुंबीय आहेत. या सोहळ्यावेळी उष्माघाताने काही सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे, अशी हळहळ महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, श्री सदस्यांचा परिवार देशविदेशात पसरला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारे जण या आपद्गस्तांसोबत कायम आहोत. मृतांना सद्गती आणि त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. मात्र, त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा असल्याचे डॉ. धर्माधिकारी यांनी जारी केलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.