किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल– पुण्यातील विधानसभा पोटनिवडणूक,
नवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रातून विधानसभेच्या दोन जागांसाठी होणार्या पोटीनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड मतदारसंघातून भाजपाने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे.
पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप तसेच कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. या दोन्ही मतदारसंघात २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत असून, २ मार्चला मतमोजणी होणार आहे. अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. कसबापेठ मतदारसंघात मात्र भाजपाने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने मागील आठवड्यात मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांची भाजपा प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती, त्यामुळे टिळक यांच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले होते.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपरी चिंचवड येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबातील कोणाला भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह यांनी आज भाजपा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे आमदाराच्या निधनानंतर त्या मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक अविरोध केली जाते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुका अविरोध व्हाव्या, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अविरोध होणार नाही, असा अंदाज आहे.