किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरण,
मुंबई, (१२ सप्टेंबर) – पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणातील चार फरार अतिरेक्यांच्या माहितीसाठी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती अधिकार्याने मंगळवारी दिली. मोहम्मद शाहनवाझ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल अली, अब्दुल्ला फैयाझ शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान अशी या फरार अतिरेक्यांची नावे आहेत. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे एनआयएने सांगितले.
एनआयएने नुकतीच पुण्यातील मॉड्युलचा एक भाग म्हणून इसिसच्या कारवायांना प्रोत्साहन देणार्या काही जणांना अटक केली. इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएने छापेमारी केली आणि देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा इसिसने रचलेल्या कटाचा पर्दाफाश करणारे साहित्य जप्त केले होते, असे अधिकार्याने सांगितले. एनआयएने मागील महिन्यात या प्रकरणात शमिल साकिब नाचन याला अटक केली होती. ठाणे जिल्ह्यातील त्याच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. या माध्यमातून इतर आरोपींसह त्याने देशात दहशतवादी कारवाया घडवण्याचा रचलेला कट उधळल्याचा दावा एनआयएने केला.