किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (१३ सप्टेंबर) – आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
आजपासून देशात ‘आयुष्मान भव’ मोहिमेस सुरुवात झाली असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्याच्या मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेंतर्गत एकत्रितपणे दोन कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी आयुष्मान भव ही महत्त्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविली जाणार आहे.
विविध उपक्रमांचा शुभारंभ
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या निक्षय मित्र व जिल्ह्यांना गौरविण्यात आले तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्यात दोन कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू
ही मोहीम राबवताना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
२ ऑक्टोबरला आयुष्मान ग्रामसभा
२ ऑक्टोबर रोजी आयुष्मान ग्रामसभा होणार असून, ती आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेत पात्र लाभार्थ्यांची यादी तसेच यापूर्वी ज्या लाभार्थिंनी आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशाची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.