किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपुणे, (१४ सप्टेंबर) – १५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून बुधवारपर्यंत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागा ने अंदाज वर्तवला आहे की, ही प्रणाली चांगल्या चिन्हांकित कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी मजबूत होईल आणि दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल. भारतीय हवामान विभाग-पुणे, हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, हवांची हालचाल महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मध्य महाराष्ट्रातील घाटांसह राज्यात सक्रिय पाऊस पडेल. राज्याच्या काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
ते पुढे म्हणाले, बहुतेक हंगामात खराब मान्सूनचा फटका सहन करणार्या महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. शेतकर्यांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुढील २४ तासात राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सायंकाळच्या सुमारास राज्यात मान्सून सक्रिय होऊ शकतो. १४-१६ सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहील. राज्यात वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता बळावली आहे. कोकणात १४ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही १५ ते १६ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात कोल्हापूर, जळगाव, सातारा, नाशिक आणि पुणे या घाटांवर मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सुरुवात झाली आहे.