किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलछत्रपति संभाजीनगर, (१२ सप्टेंबर) – श्री स्वामी मच्छिंद्रनाथ व श्री सप्तशृंगी माता मंदिर मिटमिटा,छत्रपति संभाजीनगर येथे पंचकुंडी महापर्जन्य याग व परमपूज्य श्री मंगलनाथ महाराज जन्मोत्सव असंख्य शिष्य व भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक ८ सप्टेंबर रोजी महापर्जन्य यागाला सुरुवात झाली.
पर्जन्य याग
पुण्यवाचन, देवता स्थापन, मातृका पूजन होऊन इंद्रदेवाचे , वरुण देवाची मंत्रोच्चारात पर्जन्य देवतेची प्रार्थना करण्यात आली. निसर्गाने ही या कार्यक्रमाला भरभरून आशीर्वाद देऊन मुसळधार पावसाची बरसात केली दिनांक ९ सप्टेंबर, श्रावण वद्य दशमी परमपूज्य मंगलनाथ महाराजांचा जन्मदिवस. शिष्य व भक्तांच्या उपस्थितीत सकाळी प्रातःस्मरण व मानसपूजा संपन्न झाली त्यानंतर सद्गुरु पूजन धवल वस्त्र अर्पण व मंगल गाथा पोथीचे चक्री पारायण करण्यात आले स्वामी मच्छिंद्रनाथ महाराजांना १०८ वेळा अनुग्रह मंत्राने विभूती अभिषेक करण्यात आला याप्रसंगी श्री देवीदास कुलकर्णी यांचा लघुरुद्र पण आयोजित करण्यात आला होता परमपूज्य मंगलनाथ महाराजांच्या समाधीला गांगोदकाने सिंचन करून शिष्यांनीच उगाळलेल्या चंदनाचा लेप देण्यात आला.पुष्पहार अर्पण करून समाधीचे पूजन झाले. परमपूज्य मंगलनाथ महाराजाच्या समाधीला २१ वेळा अनुग्रह मंत्राने विभूती अभिषेक करण्यात आला.पर्जन्य यागाच्या दुसर्या दिवशी पळस,आंबा,दुर्वा,दर्भ औदुंबर, पिंपळ, वडाच्या समिधांची वरुण आणि इंद्रदेवाच्या मंत्रोच्चाराने आहुती देण्यात आली . त्यानंतर पूर्णाहुती झाली नारायण पूजन महाआरती व महाप्रसाप्रसादाने या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.मिटमिटा परिसरातील बरेच शेतकरी,भक्त , असंख्य शिष्य तसेच बाहेर गावाहून सुद्धा परमपूज्य मंगलनाथ महाराजांचे बरीच शिष्य मंडळी उपस्थित होती.