किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल– १९९२ पासून होता फरार, भारतात आणणार,
मुंबई, (१२ सप्टेंबर) – कुख्यात दाऊद इब्राहिमचा नातेवाईक आणि जेजे हॉस्पिटल गोळीबार प्रकरणातील फरार गुन्हेगार नाजिर मोहम्मद फाकीला विदेशात अटक करण्यात आली. हसिना पारकरचा पती इस्माईल पारकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदने त्याचा वापर केला होता. १९९२ पासून फरार असलेल्या नाजिरला भारतात आणल्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती हाती येणार आहे. नाजिर पाकिस्तानात दाऊद आणि छोटा शकीलसोबतही राहिला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांत त्याची भूमिका होती, असे तपासात समोर आले. नाजिरकडून पाकिस्तान आणि दाऊदच्या टोळीबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे अधिकार्यांनी सांगितले.
नाजिरबाबत माहितीमिळाल्यानंतर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता, असे मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. त्यानंतर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. नाजिरला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकर सुरू केली जाणार आहे.
नाजिर मोहम्मद जेजे रुग्णालयातील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी रहिम मोहम्मद फाकीचा लहान भाऊ आहे. रहिमचे लग्न इस्माईल पारकरच्या बहिणीसोबत झाले होते. इस्माईलची हत्या अरुण गवळी टोळीने १९९२ मध्ये केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाऊदच्या टोळीने एके-४७ रायफलींचा वापर करीत गोळीबार केला होता. या गोळीबारात हळदणकरसह दोन पोलिस कर्मचार्यांचा मृत्यू झाला होता. नाजिरने या हल्ल्याचा कट रचला होता आणि आरोपींना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.