किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल-मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना,
पुणे, (११ सप्टेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत् पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते. भाविक श्रद्धेने आणि भक्तिभावाने येथे दर्शनाला येतात. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.
आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च करण्यात आले आहे. येथे येणार्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.