किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध=
स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] – रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ब्रिटिशचे जे. फ्रासेर स्टॉडर्ट आणि नेदरर्लंडचे बर्नार्ड फेरिंगा या वैज्ञानिकांना आज बुधवारी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
नियंत्रित राहील अशा पद्धतीने रेणुंची रचना आणि संश्लेषणाची महत्त्वाची कामगिरी या तीन वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला असून, ९ लाख ३० हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नवीन मटेरियल, सेन्सर्स आणि एनर्जी स्टोअरेज सिस्टिम यासारख्या वस्तूंच्या विकासात मॉलेक्युलर मशिन्सचा प्रामुख्याने वापर केला जातो, असे रॉयल स्विडीश अकादमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे.
यावर्षीच्या विज्ञान पुरस्कारातील रसायनशास्त्राचा हा पुरस्कार शेवटचा होता. वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जपानच्या जीवशास्त्रज्ञांना आणि भौतिकशास्त्राचा नोबेल ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना विभाजून देण्यात आला आहे.
शुक्रवारी शांततेचा नोबेल
येत्या शुक्रवारी यावर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात आर्थिक आणि साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येईल. या पुरस्काराचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे आयोजित कार्यक्रमात या सर्वांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येईल.