किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– गुजरात दुसर्या स्थानावर
– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अहवाल,
नवी दिल्ली, २ सप्टेंबर – देशातील अनेक राज्यांना स्वाईन फ्लू या घातक आजाराचा विळखा बसला असून, या रोगाने सर्वाधिक बळी महाराष्ट्रात घेतले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४४८ नागरिकांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षभरात देशात स्वाईन फ्ल्यूमुळे १,१०० लोकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील बळींची संख्या सर्वाधिक म्हणजे ४४८ इतकी आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे, असे या आकडेवारीत नमूद आहे.देशभरात गेल्यावर्षी २२,१८६ नागरिकांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली. व्हायरस स्ट्रेनमधील झालेल्या बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.नॅशनल सेंटर फॉर डिजिस कंट्रोल (एनसीडीसी), दिल्लीतील एम्स आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थांनी अलीकडेच एक सर्वेक्षण केले. त्यानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्ल्यूचे वेगळे स्ट्रेन आढळून आले आहेत. यंदा स्वाइन फ्ल्यूचे मिशिगन स्ट्रेन आढळून आले. यापूर्वी, याच रोगात कॅलिफोर्निया स्ट्रेन आढळून आले होते, असे एनसीडीसीचे संचालक डॉ. ए. सी. धारीवाल यांनी सांगितले. तथापि, या स्ट्रेनचे नेमके काय परिणाम होतात, हे स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीत महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूच्या संशयित आजाराचे जे रुग्ण आढळले, त्यात एक चतुर्थांश लोकांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे दिसून आले. या आजारामुळे दगावणार्यांमध्ये २० ते २५ वयोगटातील लोकांचा सहभाग जास्त आहे. गेल्या वर्षी राज्यात स्वाईन फ्ल्यूने २५ लोक दगावले होते. गुजरातमध्ये ४,७४१ लोकांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे.उत्तरप्रदेशात २७९८ लोकांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. २००९ मध्ये हा आकडा केवळ ८७१ एवढा होता. १७ लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. या वर्षी ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये ३१, हिमाचल प्रदेशात २७, मध्यप्रदेशात २३, राजस्थानात ८६, केरळात ७४, तामिळनाडूत १५, गोव्यात १९, आसामात ४ आणि प. बंगालमध्ये ५ लोकांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे या आकडेवारी दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)