किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी –
अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वखालील रशिया आणि यापूर्वीच्या अमेरिकेत साम्य असल्याचे नमूद करताना, अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी जाहीर कबुली दिली. यामुळे अमेरिकेतील सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या टीकेची झोड उठवली आहे.
व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देखील जगात असंख्य लोकांचा बळी गेला आहे. पुतिन हे मारेकरी आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेतील पूर्वीच्या सत्ताधार्यांनीही चुकीची धोरणे राबविल्याने अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकट्या पुतिन यांनाच जबाबदार धरता येणार नाही. कारण, अमेरिका देखील पूर्णपणे निर्दोष नाही, असे ट्रम्प यांनी मान्य केले.
अमेरिकेच्या धोरणांकडेही मारेकर्याच्या दृष्टिकोनातूनच पाहावयास हवे. इराकवर अमेरिकेने लादलेल्या युद्धाला माझा आधीपासूनच विरोध होता. त्यामुळे जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेकडूनही अनेक मोठ्या चुका झाल्या आणि या चुका अनेकांचा बळी घेण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत, हे मी मान्य करायलाच हवे. आपला देश हा पूर्णपणे निष्पाप आहे, असा समज कोणीही करून घ्यायला नको, एवढेच मला यातून सांगायचे असल्याचे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, इसिस या जहाल दहशतवादी संघटनेविरुद्धच्या लढ्यात रशियासोबत सहकार्य करण्याची इच्छा ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केली.
जगातील अनेक लोकांचा मी सन्मान करतो, पण त्याचा अर्थ असा नक्कीच नाही की मी त्यांच्या गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करीन. पुतिन यांच्याविषयी देखील माझ्या मनात आदर आहे. ते त्यांच्या देशाचे नेते आहेत.
तथापि, दहशतवादविरोधील विशेषत: इसिसविरोधातील लढ्यात रशिया आणि अमेरिकेने एकत्र यायलाच हवे. कारण, जगातील हा सर्वात मोठा लढा असून, यात शक्तिशाली देशांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांचा टीकांचा भडिमार
दरम्यान, ट्रम्प यांच्या या व्यक्तव्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी प्रखर टीका केली आहे. रशियासारख्या हुकुमशाही आणि हिंसक राजवटीसोबत अमेरिकेची करण्यात आलेली तुलना अयोग्य व निषेधार्ह आहे. राष्ट्राध्यक्षांच्या या धोकादायक धोरणाला विरोध करणे आणि त्यांचा जाहीर निषेध करणे अमेरिकेचे कर्तव्य आहे. केवळ लोकप्रतिनिधींनीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही ट्रम्प यांचा निषेध करायलाच हवा, अशी भूमिका सिनेट सदस्य बेन कार्डिन यांनी विशद केली आहे.