किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=मुलायमसिंहांचे पुन्हा घूमजाव!,
वृत्तसंस्था
लखनौ, ६ फेब्रुवारी –
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे तळ्यात आणि मळ्यात अजूनही सुरूच आहे. सपा-कॉंगे्रस आघाडीवर नाराजी व्यक्त करून, आपण केवळ भाऊ शिवपाल यादव यांच्यासाठीच प्रचार करणार असल्याचे ठामपणे सांगणारे नेताजी आता पुन्हा एकदा मुलायम झाले आहेत. मी फक्त माझ्या पुत्रासाठीच प्रचार करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यादव कुटुंबात आणि पक्षात कोणताही वाद नाही. अखिलेश यादव हेच उत्तरप्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे मुलायमसिंह यादव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शिवपाल यादव आणि अमरसिंह हे नाराज नाही. सध्या पक्षात कोणीही नारज नाही. या नेत्यांचा नाराज होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या कुटुंबातही वाद नाही. अखिलेशच पुढील मुख्यमंत्री होतील. उद्या मंगळवारपासून मी सपा आणि कॉंग्रेस आघाडीचा प्रचार सुरू करणार आहे.
विशेष म्हणजे, कौटुंबिक कलहानंतर मुलायम सिंह यांनी अखिलेशला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मानण्यास नकार देत, नवे आमदार स्वत: आपला नेता निवडतील, असे जाहीर केले होते.