Posted by वृत्तभारती
Sunday, August 14th, 2016
=पीडित आई, मुलीची सुप्रीम कोर्टात धाव= नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागातील राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली आई व अल्पवयीन मुलीने समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री आझम खान आणि दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोबतच हे प्रकरण नवी दिल्लीतील न्यायालयात वर्ग करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. २९ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावर काही दरोडेखोरांनी कार लुटल्यानंतर पुरुष...
14 Aug 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 17th, 2016
=अधिभार हटविला= मुंबई, [१७ मे] – पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणारा राज्य विशेष अधिभार रद्द करण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झाल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. डिझेलवर प्रति लिटर ९१ पैसे, तर पेट्रोलवर प्रति लिटर १ रुपया १२ पैसे अधिभार लावला जात होता. मात्र, सोमवारी मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेजारच्या राज्यांपेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होणार असल्याने त्यांची विक्री वाढून राज्य सरकारच्या महसुलात...
17 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 17th, 2016
=फॉरेन्सिक लॅबचा अहवाल= नवी दिल्ली, [१७ मे] – राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या ९ फेबु्रवारी रोजी दहशतवादी अफजल गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात देण्यात आलेल्या भारतविरोधी नारेबाजीचा व्हिडीओ अगदी खरा असल्याचा अहवाल फॉरेन्सिक प्रयोगशाळेने दिला आहे. यामुळे विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि त्याचे अन्य सहकारी चांगलेच अडचणीत येणार आहेत. विद्यापीठ परिसरात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या नसून, विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठीच अभाविपने बनावट व्हिडीओ समोर आणला आहे, असा आरोप...
17 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 17th, 2016
वाराणसी, [१७ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना नारी जागरण सन्मान-२०१६ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नारी जागरण संस्थेद्वारा देण्यात येणारा हा पुरस्कार मे महिन्याच्या शेवटी बीएचयुत आयोजित एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना नारी जागरण मासिकाच्या संपादिका मीना चौबे यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी हीराबेन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात मासिकातर्फे प्रकाशित करण्यात येणार्या जननी जन्मभूमी या विशेषांकाचे लोकार्पणही हीराबेन यांच्या...
17 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
नवी दिल्ली, [१६ मे] – महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश यावर्षी एमएच-सीईटीद्वारेच करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे सांगितले. ‘नीट’ च्या संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी झाल्यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रपरिषदेत तावडे म्हणाले की, या बैठकीत आम्ही महाराष्ट्राची बाजू जोरकसपणे मांडली. किमान यावर्षी तरी महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश एमएच-सीईटीच्या माध्यमातूनच होऊ...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
मुंबई, [१६ मे] – महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजानन पाटील याने ३० कोटी रुपयांची कथित लाच मागितल्या प्रकरणी माझ्यावर निराधार आरोप करणार्या व्यक्तीवर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार आहे. मी स्वत: चौकशीची मागणी यापूर्वीच केली आहे. सीबीआयच काय, पण अन्य कोणत्याही मोठ्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी केल्यास त्यासाठीही आपली तयारी आहे. याप्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही, असे राज्याचे...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
=किरीट सोमय्यांची शिवसेनेच्या मुखपत्राला नोटीस= मुंबई, [१६ मे] – भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सामना या वृत्तपत्राने ४८ तासांत विनाअट माफी मागून त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातमीइतकीच प्रसिद्धी द्यावी, अन्यथा या वृत्तपत्राच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, असा इशारा कायदेशीर नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. दै. सामना या वृत्तपत्राने रविवार, १५ मे २०१६ रोजीच्या अंकात पहिल्या पानावर ‘बिनबुडाच्या किरीट सोमय्यांचा घोटाळा’ अशा शीर्षकाची...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
चेन्नई, [१६ मे] – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटच्या टप्पाला आज सुरूवात झाली आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या तीन राज्यात आज विधानसभा मतदान होत आहे. सकाळी मतदाना सुरूवात झाली असून तामिळनाडूमध्ये २३४, केरळमध्ये १४० तर पुडुचेरीत ३० जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला उमेदवार रिंगणात आहेत. ५८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार असून तामिळनाडूत एकूण ६५,६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
मुंबई, [१६ मे] – दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६ जून रोजी समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे, अशी माहिती प्रख्यात खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. पावसाच्या दिवसात मुंबईत समुद्राच्या भरतीच्या वेळेला पाणी साचण्याची भीती अधिक आहे. अशावेळी नगर पालिकेलाही आपत्कालीन यंत्रणा...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
सुरत, [१५ मे] – विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांचे चुरत भाऊ भरत तोगडिया त्यांच्यासह तिघांच्या हत्येप्रकरणी सुरत पोलिसांनी आज रविवारी तीन आरोपींना अटक केली आहे. अमरेली जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारात खंडणी मागितली असता, भरत तोगडिया यांचा मित्र बालू हिराणीने ती देण्यास नकार दिला. यावरूनच हे हत्याकांड घडले असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या हत्याकांडात एकूण सात आरोपी असून, उर्वरित चौघांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या हत्याकांडावरून भाजपाच्या विरोधकांनी भाजपावर जोरदार...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, May 15th, 2016
मुंबई, [१४ मे] – बदलत्या जीवनशैलीत टीव्हीचा मोठा परिणाम बालमनावर होत असून ९७ टक्के मुले टीव्हीच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव टर्नस न्यू जनरेशन संस्थेने नुकत्यात केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. मुंबईत ९७ टक्के मुलांचा टीव्ही पाहण्याकडे अधिक कल असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. तर ४४ टक्के मुलांचे लक्ष केवळ अभ्यासाकडेच असल्याचे उघड झाले आहे. तर २९ टक्के मुले सोशल नेटवर्किंग साईट्सवर गुंतली आहेत. मुंबईतील ५ ते १४ वयोगटांतील सात हजारांहून अधिक लहान...
15 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, May 14th, 2016
=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व दहा जणांवरील मोक्का आरोपही मागे= मुंबई, [१३ मे] – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व इतर पाच आरोपींवरील सर्व आरोप शुक्रवारी मागे घेत त्यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व दहा आरोपींवर मोक्का या कठोर कायद्यांतर्गत लावलेले आरोपही मागे घेतले आहेत. या घटनेच्या तपासादरम्यान प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर पाच आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे आढळून आले...
14 May 2016 / No Comment / Read More »