किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलचेन्नई, [१६ मे] – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटच्या टप्पाला आज सुरूवात झाली आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या तीन राज्यात आज विधानसभा मतदान होत आहे. सकाळी मतदाना सुरूवात झाली असून तामिळनाडूमध्ये २३४, केरळमध्ये १४० तर पुडुचेरीत ३० जागांवर मतदान होणार आहे.
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला उमेदवार रिंगणात आहेत. ५८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार असून तामिळनाडूत एकूण ६५,६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तर पुडुच्चेरीमध्ये ३० जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. यात २१ महिला आहेत. केरळमध्ये सत्ताधारी यूडीएफ आणि एलडीएफमध्ये मुख्य लढत आहे. केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी १२०३ उमेदवार रिंगणात आहेत. यात १०१ महिला आहेत.
तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, द्रमुक – कॉंग्रेस, भाजप आघाडी यांच्यात चुरस रंगणार आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, एस करुणानिधी आणि व्ही. एस. अच्युतानंदन हे प्रमुख नेते निवडणूक रिंगणात आहेत. तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये पक्षविस्ताराच्या दृष्टिने भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
दरम्यान, तामिळनाडू, केरळ, पुडुच्चेरी, आसाम आणि प. बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे.