किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, [१४ मे] – बदलत्या जीवनशैलीत टीव्हीचा मोठा परिणाम बालमनावर होत असून ९७ टक्के मुले टीव्हीच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव टर्नस न्यू जनरेशन संस्थेने नुकत्यात केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे.
मुंबईत ९७ टक्के मुलांचा टीव्ही पाहण्याकडे अधिक कल असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. तर ४४ टक्के मुलांचे लक्ष केवळ अभ्यासाकडेच असल्याचे उघड झाले आहे. तर २९ टक्के मुले सोशल नेटवर्किंग साईट्सवर गुंतली आहेत.
मुंबईतील ५ ते १४ वयोगटांतील सात हजारांहून अधिक लहान मुले या सर्वेक्षणात सहभागी झाली होती. जेवणासह टीव्ही पाहणे योग्य नाही, असे आरोग्यतज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. मात्र, टीव्ही पाहत एकत्रित जेवण करण्याच्या संस्कृतीने आता अनेक घरांत मूळ धरले आहे. त्याचा विपरीत परिणाम लहान मुलांवर होत आहे.
या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ५ ते ७ वयोगटांतील मुले जेवणाबाबत फारशी उत्साही नसतात. जेवणाला नकार देण्यात टीव्ही पाहणे हे मोठे कारण आहे. लक्ष विचलित झाल्याने व जेवणाआधी जंकफूड खाल्ल्याने घरी बनवलेल्या आहाराकडे दुर्लक्ष होते. यासाठी जेवताना टीव्ही पाहण्याच्या सवयीला मुरड घातली पाहिजे व मुलांना जंकफूडचे सेवन करू देऊ नये, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
२०१२ मध्ये मुलांना महिन्याचा ‘पॉकेट मनी’ साधारणत: २०० रुपये मिळत होता. आता तो ५५५ रुपयांवर गेला आहे. ५० टक्के मुले पैशांची बचत करीत असून यात मुलींची संख्या सर्वाधिक आहे. ५० टक्के मुले पैसे कपडे, जंकफूड व खेळण्यांवरच खर्च करतात, असेही सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाल्याचे टर्नस इंटरनॅशनल प्रा. लि. चे दक्षिण आशियातील संचालक सिद्धार्थ जैन यांनी सांगितले.
८० टक्के पालकांचे मुलांसह कार्टून नेटवर्क
दररोज मुलांसह टीव्ही पाहणार्या पालकांची संख्या अधिक आहे. टीव्हीवर मुले काय पाहणे पसंत करतात हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले असता मुलांसह टीव्ही पाहणार्या पालकांची संख्या ८० टक्के असल्याचे आढळून आले. कार्टून नेटवर्क व पोगो ही मुलांसह पालकांचीही आवडीची कार्टून वाहिनी बनली आहे. मुलाबरोबर टीव्ही पाहताना ७२ टक्के पालकांनाही कार्टून पाहणे पसंत पडू लागले आहे.