किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– ऑक्सफोर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत संयुक्त उपक्रम,
मुंबई, (२३ डिसेंबर) – मुंबई विद्यापीठ लवकरच ऑक्सफोर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत मंदिर व्यवस्थापनावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमात स्वारस्य असलेल्या उमेदवारांनी भारतातील मंदिरे व्यवस्थापित करण्याचे शिकविण्यास मदत करण्यासाठी हा अभ्यासक्रम वास्तविक जीवनातील प्रेरणादायी उदाहरणांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या आवडी आणि रोजगाराच्या संधींवर आधारित, विद्यापीठ भविष्यात पदव्युत्तर पदविका किंवा एमबीए कार्यक्रमापर्यंत विस्तार करू शकते. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या हिंदू अभ्यास केंद्र आणि संस्कृत विभागाने ऑक्सफोर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून हिंदू तत्त्वज्ञानाच्या सर्वसमावेशक अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाईल. दोन्ही विभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक‘म विकसित करणार आहे. उच्चशिक्षण अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणाली समाविष्ट करण्यावर भर देणार्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
मंदिरे ठरताहेत् सकारात्मक उदाहरण
देशातील मंदिरे सकारात्मकतेचे उदाहरण ठरत आहेत. काही मंदिरे सौर आधारित यंत्रणांचा वापर करून वीज उत्पादन करीत आहेत, तर काही भाविकांनी वाहिलेल्या फुलांपासून उदबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देत रोजगाराच्या संधी निर्माण करीत आहेत. काही मंदिरांनी तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांच्या लांबच लांब रांगा व्यवस्थापित केल्या. मंदिरातील भाविकांच्या रांगा व्यवस्थापित केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे रविकांत सांगुर्डे आणि माधवी नरसाळे हे अभ्यासक‘माचे समन्वयक असतील.
शेगावचे गजानन महाराज संस्थान ठरले प्रेरणा
जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूटने हा अभ्यासक्रम मंदिर व्यवस्थापनात प्रेरणादायी ठरलेल्या शेगावातील गजानन महाराज मंदिर व्यवस्थापन किंवा इस्कॉनच्या अनुभवातून विकसित केला आहे.