किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=फॉरेन्सिक लॅबचा अहवाल=
नवी दिल्ली, [१७ मे] – राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या ९ फेबु्रवारी रोजी दहशतवादी अफजल गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात देण्यात आलेल्या भारतविरोधी नारेबाजीचा व्हिडीओ अगदी खरा असल्याचा अहवाल फॉरेन्सिक प्रयोगशाळेने दिला आहे. यामुळे विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि त्याचे अन्य सहकारी चांगलेच अडचणीत येणार आहेत.
विद्यापीठ परिसरात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या नसून, विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठीच अभाविपने बनावट व्हिडीओ समोर आणला आहे, असा आरोप कन्हैयाने केला होता. त्यानंतर सर्व व्हिडीओ फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यातील चार व्हिडीओ सत्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे कन्हैया आणि त्याच्या साथीदारांनी विद्यापीठात भारतविरोधी आणि अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या, हे आता सिद्ध झाले आहे.
संसदेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचणारा पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अफजल गुरूला फाशी देण्यात आलेला ९ फेबु्रवारी हा दिवस जेएनयूमध्ये साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. गुजरातच्या गांधीनगरमधील न्याय सहायक प्रयोगशाळेत या व्हिडीओ क्लिप्सची तपासणी करण्यात आली असून, त्यातील चार व्हिडीओ पूर्णपणे सत्य असल्याचे प्रयोगशाळेने म्हटले आहे. सूत्राच्या मते, हे सर्व व्हिडीओ विद्यापीठातील सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीत केले होते.