किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=पीडित आई, मुलीची सुप्रीम कोर्टात धाव=
नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागातील राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली आई व अल्पवयीन मुलीने समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री आझम खान आणि दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोबतच हे प्रकरण नवी दिल्लीतील न्यायालयात वर्ग करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
२९ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावर काही दरोडेखोरांनी कार लुटल्यानंतर पुरुष मंडळींना बांधून ठेवले आणि मायलेकीवर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना, या घटनेमागे राजकीय कटकारस्थान असू शकते, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांनी आपण असे बोललोच नाही, असा खुलासाही केला.
आझम खान हे उत्तरप्रदेशातील सत्तारूढ समाजवादी पार्टीचे नेते असल्याने या प्रकरणी आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हा खटला दिल्लीत चालविण्यात यावा, अशी विनंती पीडित महिलेल्या पतीने याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा सपाच्याच हाती असल्याने तपासही अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सक्षम आणि निष्पक्ष तपास यंत्रणेकडे तपास सोपविण्यात यावा, अशी विनंतीही करण्यात आली.