Posted by वृत्तभारती
Saturday, January 18th, 2014
कोलकाता, (१७ जानेवारी) – हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी कोलकात्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. सुचित्रा सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रक्तातील प्राणवायूची पातळी कायम ठेवण्यासाठी त्यांच्या श्वसनमार्गात बसविलेली नळी काढून टाकण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये साचलेले पाणी काढून टाकण्याचा...
18 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 4th, 2014
=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय= नवी दिल्ली, (३ जानेवारी) – बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम मशिन्समुळे पार विसरूनच गेलो आहोत. पण, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आगामी निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्यावर बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याचीच वेळ येणार आहे. एटीएममधून पैसे काढणार्या ग्राहकांकडून निश्चित शुल्क वसूल करण्याचे अधिकार बँकांना देण्याचा विषय आरबीआयच्या विचाराधीन आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर के.सी. चक्रवर्ती यांनी एटीएम सेवेसाठी बँका शुल्क वसूल...
4 Jan 2014 / No Comment / Read More »