किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलकोलकाता, (१७ जानेवारी) – हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी कोलकात्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. सुचित्रा सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रक्तातील प्राणवायूची पातळी कायम ठेवण्यासाठी त्यांच्या श्वसनमार्गात बसविलेली नळी काढून टाकण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये साचलेले पाणी काढून टाकण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
यशस्वी कारकीर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. एवढंच नव्हे,तर २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यासही त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर, गेल्या महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुचित्रा सेन यांना बेल व्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २६ दिवसांपासून त्यांच्या तब्येतील चढउतार सुरू होते. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून होते. परंतु हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि डॉक्टरांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. बॉलिवूडची एक देखणी, गुणी आणि यशस्वी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.सुचित्रा सेन यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील एक पर्व संपले.
आपला पहिला चित्रपट करताना त्या एका मुलीची आई होत्या, हेही विशेष. त्यांच्या लोकप्रियतेच्या काळात बंगालमध्ये दूर्गापूजेच्या वेळी तयार होणार्या दूर्गादेवीच्या मूर्ती सुचित्रा यांच्या चेहर्याशी साधर्म्य सांगणार्या असत. त्यांची साडी नेसण्याची पद्धत, केशरचना एवढेच नाही तर गॉगल्स लावण्याची पद्धतही त्याकाळी ‘फॅशन’ ठरली होती. जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार्या एका निर्मात्याला मुंबईत सगळ्या सेटसमोर त्यांनी थप्पड लगावली होती. त्यांच्या कणखर स्वभावामुळेच चांगली मैत्री असूनही दिग्दर्शक गुलजार त्यांना ‘सर’ असेच संबोधित असत. बंगाली अभिनेता उत्तम कुमारसोबतची त्यांची केमिस्ट्री आदर्श होती. माध्यमांना त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा संशय होता. याविषयी उत्तम कुमार यांना विचारले असता,‘आम्ही बहिण-भाऊ किंवा प्रियकर-प्रेयसी नाही. ती माझी ‘प्रियो बांधबी’ आहे,’ असे उत्तर दिले होते. ‘लाडकी मैत्रीण’ असा बंगालीत याचा अर्थ आहे. १९७० मध्ये याच नावाच्या एका चित्रपटात उभयतांनी एकत्र काम केले होते. त्यांचे मूळ नाव रोमा असे होते आणि त्या नावाने केवळ उत्तम कुमारच त्यांना आवाज देत असत. ‘बिपाशा’ या १९६२ मध्ये आलेल्या चित्रपटासाठी त्यांनी एक लाख रुपये मानधन घेऊन एक विक्रमच केला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी र् यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, अंतिम विधीपूर्वी त्यांना बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी एकूण साठ चित्रपटांत काम केले. त्यात ७ हिंदी तर ५३ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या तत्वनिष्ठतेमुळे त्यांना ‘ग्रेटा गार्बो’ असे संबाधले जात असे. पद्मश्री आणि बंगविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सुचित्रा यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीसह राजकारण आणि समाजकारणाशी संबंधित अनेक नामवंतानी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
चित्रपट निर्मात्या कल्पना लाजमी : केवळ डोळ्यांनी भावना व्यक्त करून अभिनय करण्याचे कसब कोणी सुचित्राकडून शिकावे. ‘क्लोज अप’ दृष्यांमध्ये तिच्यापेक्षा कदाचितच दुसरी एखादी अभिनेत्री सुंदर दिसू शकेल. ‘आंधी’ हा चित्रपट नवोदितांनी अभ्यास म्हणून पाहावा. कमी शारीरिक हालचाली पण जबरदस्त अभिनय. हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणार्या या ‘बंगाली ब्युटी’ने बंगाली चित्रपटांत अमीट छाप सोडली आहे.
अमिताभ बच्चन : आणखी एक महान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीने आपली गरिमा कायम राखत हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीला धन्य केले.
नरेंद्र मोदी : सुचित्रा सेन यांना श्रद्धांजली. त्यांच्या निधनामुळे आपण सर्वांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील एका महान कलाकाराला गमावले आहे.
रेखा : ‘ममता’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केेले. त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण अविस्मरणीय आहे.
श्रीदेवी : जबरदस्त प्रतिभावान अभिनेत्री, अद्वितीय सौंदर्यवती सुचित्रा सेन यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. येणार्या अनेक पिढ्या त्यांच्या अभिनयातून प्रेरणा घेतील.
सुषमा स्वराज : सन्मान आणि सौंदर्याचे अद्भुत मिश्रण होत्या सुचित्रा. मी त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करते.
सुचित्रा सेन यांची कारकीर्द
जन्म : ६ एप्रिल १९३१
मूळ नाव : रोमा दासगुप्ता
जन्मस्थान : पाबना, बंगाल प्रसिडेन्सी (आता बांग्लादेशात)
पती : दिबानाथ सेन (१९४७ मध्ये)
अपत्य : मूनमून सेन
१९५२ – ‘शेष कोथाई’ या बंगाली चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण
१९५५ -‘देवदास’ या चित्रपटातील पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता.
१९६३ – मॉस्को चित्रपट महोत्सवात ‘सात पाके बंध’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१९७६ – ‘आंधी’ या चित्रपटातील आरती देवी या भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्तम अभिनेत्रीचे नामांकन
पुरस्कार : पद्मश्री आणि बंगबिभूषण