किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.76° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 26.81°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.67°से. - 26.83°से.
गुरुवार, 30 जानेवारी घनघोर बादल23.92°से. - 25.55°से.
शुक्रवार, 31 जानेवारी टूटे हुए बादल22.85°से. - 24.28°से.
शनिवार, 01 फेब्रुवारी छितरे हुए बादल23.01°से. - 25.22°से.
रविवार, 02 फेब्रुवारी घनघोर बादल23.9°से. - 24.87°से.
सोमवार, 03 फेब्रुवारी घनघोर बादल=जमात-उद-दावा लढणार २०० जागा,
वृत्तसंस्था
लाहोर, ९ जून –
मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुढील महिन्यात होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता अतिरेक्यांचाही प्रवेश होणार आहे.
पाकमध्ये येत्या २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे, तथापि, त्याची निवडणूक आयोगात अद्याप नोंद झालेली नाही. आता निवडणुका जवळ आल्या असल्याने आयोगात नोंद असलेल्या अल्लाहू-अकबर तहरिक या पक्षाच्या माध्यमातून हाफिझने आपले उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेतला.
जमात-उद-दावाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज प्राप्त केले आहेत. अल्लाहू-अकबर आणि मिल्ली मुस्लिम लीग यांच्यात आघाडी झाली असून, हाफिझला २०० पेक्षा जास्त जागा देण्याचे मान्य झाले आहे.
हाफिझ रिंगणात उतरणार नाही
हाफिझ सईद स्वत: मात्र निवडणुकीच्या रिंगणातून दूर राहणार आहे. हाफिझ निवडणूक लढणार नाही, पण तो आपल्या संघटनेतील सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांना रिंगणात उतरवणार आहे, असे जमातच्या प्रवक्त्याने सांगितले.