किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल►चिनी माध्यमांकडून जाहीर कौतुक,
बीजिंग, ३१ ऑगस्ट –
डोकलाम मुद्यावरून भारताला युद्धापर्यंतची धमकी देणार्या चीनमधील प्रसारमाध्यमांनी आता मात्र भारताचे गुणगाण गाण्यास सुरुवात केली आहे. भारतात हिंदू धर्माची ध्वजा फडकत असल्यामुळे तिथे कट्टर इस्लामचा प्रसार होऊ शकला नाही, असे जाहीर कौतुक कट्टर इस्लामिक देश पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनमधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राने केले.
चीनमध्ये ३ ते ५ सप्टेंबर या काळात आयोजित ब्रिक्स देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे जाणार आहेत. याच अनुषंगाने डोकलाममधील कटुता बाजूला सारून चिनी माध्यमांनी आता भारताचे गुणगान गायला सुरुवात केली आहे.
ग्लोबल टाईम्सने लेखात म्हटले आहे की, भारतातील हिंदू धर्मामुळे कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण करू शकला नाही. यात भारतातील हिंदू धर्माचे कौतुक करतानाच, केवळ धर्म म्हणून आपली ओळख न ठेवता हिंदू धर्माने कशाप्रकारे एक जीवनशैली आणि सामाजिक व्यवस्थेचे रूप घेतले, याबाबतही मत मांडण्यात आले आहे.
या लेखाची सुरुवात १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ चित्रपटाच्या उल्लेखाने करण्यात आली. हा चित्रपट मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणावर आधारित असून, ते एकमेकांच्या कसे प्रेमात पडतात आणि नंतर कुटंब, धर्माची बंधने झुगारत विवाहबंधनात अडकतात, हे दाखविण्यात आले आहे. यानंतर दोघेही जातीय दंगलीत अडकतात आणि त्यानंतर होणार्या घटना या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. ग्लोबल टाईम्सने या चित्रपटाचे उदाहरण देत भारतात कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण का करू शकला नाही, याचेच हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. अन्य आशियाई देशांमध्ये कट्टर इस्लामिक संघटनांची संख्या पाहता भारतात अशा संघटनांची उपस्थिती जवळजवळ नगण्यच आहे, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. यावेळी फिलिपाईन्सचे उदाहरण देताना, कट्टरतावाद्यांनी संपूर्ण देशाचे कसे भीषण नुकसान केले, याकडेही लेखात लक्ष वेधले आहे.
भारतात इस्लामिक अतिरेक्यांचे अस्तित्त्व नसल्यासारखेच आहे. आशियातील इतर देशांशी तुलना करता या संदर्भात भारतातील स्थिती खरोखरच चांगली आहे. संपूर्ण जग यासाठी भारताचे कौतुक करते. जेव्हा कधी आशियाई धोरणांवर चर्चा केली जाते तेव्हा अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपीय देश भारताचे महत्त्व लक्षात घेतात, असेही लेखात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)