किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– २ सामन्यांच्या तारखांमध्ये मोठा बदल झाला,
नवी दिल्ली, (०२ एप्रिल) – आयपीएल २०२४ अतिशय भव्य पद्धतीने खेळवला जात आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. बीसीसीआयने आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसर्या टप्प्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. बीसीसीआयने आता आयपीएल २०२४ च्या मधल्या वेळापत्रकात बदल केला आहे. दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना १७ एप्रिल २०२४ रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, परंतु आता हा सामना १६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. याशिवाय गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना १६ एप्रिल २०२४ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, जो आता १७ एप्रिल रोजी खेळवला जाईल. या दोन सामन्यांमध्येच बदल झाले आहेत.
आयपीएल २०२४ मध्ये १० संघ सहभागी होत आहेत. यावेळी अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये क्वालिफायर सामने खेळवले जातील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाईल. तर २२ मे रोजी एलिमिनेटर सामना याच मैदानावर होणार आहे. तर दुसरा क्वालिफायर २४ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. २६ मे रोजी चेन्नईच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोनदा ट्रॉफी जिंकली आहे. राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी एक आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि आरसीबी या संघांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.