|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.88° C

कमाल तापमान : 32.62° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 50 %

वायू वेग : 4.37 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.62° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.39°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.92°C - 32.33°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.6°C - 31.92°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.63°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.18°C - 29.55°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

-निवडणूक आयोगाने जारी केल्या सूचना,
मुंबई, (२८ मे) – आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भाजपा आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा या दोन्ही निवडणुका सोबत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकारी आणि कर्मचार्यांना निवडणुकीच्या कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असा आदेश प्रशासनाला दिला. त्यामुळे राज्यात विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना एक आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी तथा कर्मचार्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश जारी केले आहेत. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकार्यांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवाल तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील विधानसभा विसर्जित करून निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम आयोगाच्या अधिकार्यांनी सुरू केले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांना कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचना केल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Posted by : | on : 28 May 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g