|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 30.69° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.69° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये चार

महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये चार

दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा,
नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर – काही राज्यांमधून मान्सून परतीच्या मार्गावर असला, तरी महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये त्याचा मुक्काम अजूनही कायमच आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्र आणि गोव्यासह ६ राज्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने आज शुक्रवारी वर्तवली आहे.
आज शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस झाला. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, केरळ आणि पुडुचेरीच्या काही भागांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागांत ९ ते १२ ऑक्टोबर या काळात जोरदार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस शक्य
पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका
मुंबई : अरबी समुद्रात आणखी नव्या चक्रीवादळाची चाहूल लागली असून, त्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या नव्या चक्रीवादळाचे नाव ‘जवाद’ असे आहे. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून, त्याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसात या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे आहे.
पावसाची टक्केवारी
जून ११० टक्के
जुलै ९३ टक्के
ऑगस्ट ७६ टक्के
सप्टेंबर १३५ टक्के

Posted by : | on : 9 Oct 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g