|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.85° C

कमाल तापमान : 27.85° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 59 %

वायू वेग : 3.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.85° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.91°C - 29.79°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.99°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.13°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.39°C - 29.78°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.16°C - 29.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.89°C - 29.11°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संसद » संसदेचे पावसाळी अधिवेशन नवीन भवनात

संसदेचे पावसाळी अधिवेशन नवीन भवनात

नवी दिल्ली, (१४ जून) – संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी नवीन संसद भवन सज्ज झाले आहे. नवीन संसद भवनातील पहिल्या अधिवेशनासाठी सर्वपक्षीय खासदार तसेच सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी अतिशय उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर नवीन संसद भवनातील अपूर्ण राहिलेली काही कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता संसदेचे पावसाळी अधिवेशन नवीन संसद भवनात होईल, हे निश्चित आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाही. मात्र, जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होईल, असा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्याच्या १२ तारखेपर्यंत हे अधिवेशन चालेल. जुन्या संसद भवनातील काही कार्यालये नवीन संसद भवनात हलवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनाही नव्या इमारतीत कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. या पक्षांनी जुन्या संसद भवनातील आपली कार्यालये नवीन संसद भवनात हलवायला सांगण्यात आले आहे.
१० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवन इमारतीचे भूमिपूजन झाले होते. अडीच वर्षांच्या विक्रमी काळात ही इमारत बांधून पूर्ण झाली. नवीन संसद भवनातील लोकसभा तसेच राज्यसभेतील आसनक्षमता जुन्या संसद भवनातील आसनक्षमतेच्या दीडपट आहे. नवीन संसद भवनातील कामकाज कागदविरहित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक खासदारांच्या आसनासमोर लॅपटॉप ठेवण्यात आला आहे. नवीन संसद भवनाची इमारत अत्याधूनिक सोयीसुविधानी परिपूर्ण आहे. मागील वर्षीचे हिवाळी अधिवेशन नवीन संसद भवनात घेण्याचा प्रयत्न होता. मात्र, काम पूर्ण न झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनच नाही तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनही जुन्या इमारतीत घ्यावे लागले होते. यावेळचे पावसाळी अधिवेशन नवीन संसद भवनात होणार, हे निश्चित आहे.

Posted by : | on : 14 Jun 2023
Filed under : राष्ट्रीय, संसद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g