|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.35° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 2.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.83°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain

तीन अमेरिकी तज्ज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर

तीन अमेरिकी तज्ज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीरस्टॉकहोम, ११ ऑक्टोबर – रोजगारासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मोलाचे कार्य करणार्‍या तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना २०२१ या वर्षाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. डेव्हिड कार्ड, जोशुआ अँगरिस्ट आणि गुईडो इम्बेन्स अशी पुरस्कार विजेत्यांची नावे असून, यंदा पुरस्काराची विभागणी फारच वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे डेव्हिड कार्ड यांना एकूण पुरस्कारातील अर्धा भाग दिला जाणार असून, उर्वरित भाग अन्य दोघांमध्ये विभागण्यात आला आहे. यापैकी जोशुआ हे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत कार्यरत...11 Oct 2021 / No Comment /

फ्रान्सच्या चर्चमध्ये लाखो मुलांचे लैंगिक शोषण

फ्रान्सच्या चर्चमध्ये लाखो मुलांचे लैंगिक शोषणशेकडो धर्मगुरूंचा सहभाग; अहवालातून माहिती उघड, पॅरिस, ५ ऑक्टोबर – फ्रान्सच्या कॅथॉलिक चर्चमध्ये अंदाजे तीन लाख ३० हजार मुले गेल्या ७० वर्षांमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत, अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका प्रमुख फ्रेंच अहवालात आढळून आली आहे. पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. मुलांवर घाणेरडी नजर ठेवणारे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना पीडोफाइल म्हटले जाते. १९५० पासून फ्रान्सच्या कॅथॉलिक चर्चमध्ये हजारो पीडोफाइल...6 Oct 2021 / No Comment /

डेव्हिड ज्युलियस, आर्डेम पटापौटियन

डेव्हिड ज्युलियस, आर्डेम पटापौटियनतापमान, स्पर्शाच्या रिसेप्टर्सचा लावला शोध, स्टॉकहोम, ४ ऑक्टोबर – वैद्यकशास्त्र किंवा औषधशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार अमेरिकेतील वैज्ञानिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापौटियन यांना जाहीर झाला आहे. तापमान आणि स्पर्शाच्या रिसेप्टरचा शोध लावल्याबद्दल त्यांना नोबेल जाहीर करण्यात आले आहे. औषधशास्त्रातील या नोबेलची घोषणा नोबेलस समितीची सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी आज केली. ज्युलिया यांनी चेतासंस्थेतील संवेदकाची ओळख पटवण्यासाठी मिरचीतील सक्रिय घटक कॅप्सायसिनचा वापर केला....4 Oct 2021 / No Comment /

तालिबानने दिलेले आश्‍वासन पाळावे

तालिबानने दिलेले आश्‍वासन पाळावेभारताचे आवाहन, जिनेव्हा, १० सप्टेंबर – अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर भारताने पु्‌न्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. एक शेजारचा देश आणि त्या देशातील नागरिकांचे मित्र असल्यामुळे आम्हाला अफगाणमधील परिस्थितीबाबत चिंता वाटत असल्याचे संयुष्ट्र राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. अफगाण मुलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि अल्पसंख्यक नागरिकांच्या अधिकाराचे रक्षण करायचे आहे. सर्व घटकांचा समावेश असलेली व्यवस्था तयार करावी आणि आंतरराष्ट्रीय स्वीकार्हता आणि मान्यता मिळू शकेल...10 Sep 2021 / No Comment /

बहुतांश देशांनी अफगाणिस्तानातील बचावकार्य थांबवले

बहुतांश देशांनी अफगाणिस्तानातील बचावकार्य थांबवलेलंडन, २८ ऑगस्ट – काबुलमधील बॉम्बस्फोटानंतर अमेरिका व अन्य देशांनी अफगाणी नागरिकांच्या सुटकेचे काम सुरू ठेवले असले, तरी ब्रिटनसह काही देशांनी ही मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत माहिती संबंधित देशांकडून देण्यात आली आहे. तालिबानने अफगाणचा ताबा मिळवल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काबुल विमानतळारून नागरिकांना हवाईमार्गे अफगाणबाहेर नेण्याची मोहीम थांबवणे ही काळाची गरज असल्याचे ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॅलेस यांनी सांगितले. विमानतळावरील गर्दीतील...28 Aug 2021 / No Comment /

तालिबानला एकतर्फी मान्यता नाही : ब्रिटन

तालिबानला एकतर्फी मान्यता नाही : ब्रिटनकॅनडाचा मान्यता देण्यास नकार, चीनची सावध प्रतिक्रिया, लंडन, १९ ऑगस्ट – तालिबानला एकतर्फी मान्यता देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ब्रिटनने जाहीर केली असून, चीनने मान्यतेबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅनडाने तालिबानला लगेच मान्यता देण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानमधील नव्या सरकारला एकतर्फी नाही; तर आंतरराष्ट्रीय आधारावर मान्यता दिली जावी, अशी अपेक्षा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोलताना व्यक्त केली. अफगाणिस्तानमधील स्थितीवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली....19 Aug 2021 / No Comment /

सध्या ‘बूस्टर’ मात्रा नकोच!

सध्या ‘बूस्टर’ मात्रा नकोच!जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका, जीनिव्हा, १९ ऑगस्ट – ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बूस्टर मात्रेची गरज नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशांच्या लसीकरणाचा विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर मात्रेबाबत विचार केला पाहिजे, असेही आरोग्य संघटनेने स्पष्ट केले. कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरून ही गोष्ट निश्‍चितच म्हणू शकतो की, सध्या बूस्टर मात्रेची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, असे...19 Aug 2021 / No Comment /

कोरोनाचा नवा व्हेरिएंट घातक ठरणार

कोरोनाचा नवा व्हेरिएंट घातक ठरणारलंडन, ३१ जुलै – कोरोना महामारीशी संपूर्ण जग लढत असतानाच हा विषाणू स्वत:चे स्वरूप बदलत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिकच घातक ठरण्याची भीती ब्रिटनच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे मृत्यू दरात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ब्रिटन सरकारच्या सायंटिफीक ऍडव्हायजरी ग्रुप फॉर इमर्जंसीजच्या (एसजीई) एका अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे मृत्यूदराचे प्रमाण ३५ टक्के होण्याची भीती व्यक्त करण्यात...1 Aug 2021 / No Comment /

फ्रान्सचा गुगलला ४,४२१ कोटी रुपयांचा दंड

फ्रान्सचा गुगलला ४,४२१ कोटी रुपयांचा दंडकॉपीराईट कायद्याचे उल्लंघन भोवले, पॅरिस, १४ जुलै – फ्रान्स सरकारने गुगलला झटका देत ५०० मिलियन युरो अर्थात् ४,४२१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका पब्लिशर्ससोबत झालेल्या वादामध्ये गुगलने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करीत असल्याचे फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे. गुगलने मात्र फ्रान्स सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. गुगलने एका पब्लिशर्सच्या बातम्यांच्या वापर आपल्या सर्च इंजीनवर केला होता. त्यावर संबंधित पब्लिशर्सने कॉपीराईटच्या कायद्यांचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार...14 Jul 2021 / No Comment /

कार उडाली आकाशी, ८ हजार फुटांवरून उड्डाण

कार उडाली आकाशी, ८ हजार फुटांवरून उड्डाणअवघ्या तीन मिनिटांमध्ये उडण्यास तयार, ब्रातिस्लावा, २ जुलै – उत्तर युरोपातील स्लोव्हाकिया देशात रस्तावर धावणार्‍या एका कारने आकाराशातूनही विमानासारखे यशस्वी उड्डाण केले आहे. दोन शहरातील दोन विमानतळांपर्यंतचा प्रवास पूर्ण केल्याचे एअरकार कंपनी सूत्रांनी पत्रकारांना सांगितले. सुमारे १६० अश्‍वशक्तीचे (हॉर्स पॉवर) बीएमडब्ल्यू इंजीन लावण्यात आलेल्या कारने २८ जून रोजी स्लोव्हाकियातील आंतरराष्ट्रीय विमानतळ नित्रा आणि ब्रातिस्लावादरम्यान हवेतून प्रवास केला. हे अंतर गाठण्यासाठी हवाई कारला ३५ मिनिटांचा कालावधी लागला. एकदा इंधन भरल्यानंतर ही...2 Jul 2021 / No Comment /

राफेल विमानांनी एकाच उड्डाणात कापले १७ हजार किमी अंतर!

राफेल विमानांनी एकाच उड्डाणात कापले १७ हजार किमी अंतर!पॅरिस, २७ जून – अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या राफेल विमानांनी एक वेगळा विक्रम रचला आहे. फ्रान्सच्या या लढाऊ विमानांनी एकाच उड्डाणात पॅसिफिक महासागरात असलेला वायुतळ गाठला. यासाठी राफेल लढाऊ विमानांनी १२ तासांत १७ हजार किमीचे अंतर कापले. आतापर्यंत कोणत्याही राफेल विमानाने एकाच उड्डाणात एवढे अंतर कापले नाही. याआधी फ्रान्सहून भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांनी ६७०० किमीचे अंतर कापले होते. फ्रान्स हवाई दलाच्या एअर-टू-एअर रिफ्यूलिंग ऑपरेटर मेजर पियरिक यांनी सांगितले...27 Jun 2021 / No Comment /

क्युबावरील आर्थिक निर्बंध उठवा

क्युबावरील आर्थिक निर्बंध उठवाभारतासह १८३ देशांचे आमसभेत मतदान, संयुक्त राष्ट्रसंघ, २४ जून – क्युबाविरोधात मागील अनेक वर्षांपासून कायम असलेले अमेरिकेचे आर्थिक निर्बंध शक्य तितक्या लवकर उठविण्यात यावे, अशी मागणी करणार्‍या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील ठरावाच्या बाजूने भारतासह १८३ देशांनी मतदान केले. हे निर्बंध कायम असणे बहुराष्ट्रीयवादाच्या संकल्पनेविरोधात असून, आता संयुक्त राष्ट्रालाच त्यांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, अशी भूमिका भारताने विशद केली. या ठरावाच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनीच मतदान केले. विशेष...25 Jun 2021 / No Comment /