|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.59° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 1.74 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Friday, 10 May

27.81°C - 30°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.41°C - 29.88°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.82°C - 30.19°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 13 May

28.29°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.9°C - 30.83°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.33°C - 30.41°C

light rain

ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत ‘देश’, ‘बिंदास’ शब्दांचा समावेश

ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत ‘देश’, ‘बिंदास’ शब्दांचा समावेश-भारतीय इंग्रजीशी संबंधित ८०० पेक्षा जास्त नोंदी, लंडन, (३१ जानेवारी) – ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये(ओईडी) ‘देश’ आणि ‘बिंदास’ यासारख्या शब्दांसह भारतीय इंग्रजीशी संबंधित ८०० पेक्षा जास्त नोंदींचे उच्चार, प्रतिलेखन आणि ऑडिओ आता उपलब्ध आहेत. भारतीय इंग्रजीने ओईडीच्या उच्चारांमध्ये आणि जागतिक इंग्रजी उच्चारण ऑडिओ आर्काइव्हमध्ये अलिकडेच समाविष्ट केल्याने देशातील १३० दशलक्ष भारतीय इंग्रजी भाषिकांसाठी मोठी पोकळी भरून आली आहे, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसने सांगितले. जेव्हापासून आम्ही ब्रिटिश आणि अमेरिकी इंग्रजी व्यतिरिक्त इंग्रजीच्या...31 Jan 2023 / No Comment /

ऋषी सुनक यांनी नदीम झहावी यांना पदावरून काढले

ऋषी सुनक यांनी नदीम झहावी यांना पदावरून काढलेलंडन, (२९ जानेवारी) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख नदीम झहावी यांची कुलपती पदावरून हकालपट्टी केली आहे. नदीमवर करचुकवेगिरीचा आरोप होता. सरकारने त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली आणि त्याला मंत्रीपदाच्या संहितेचा गंभीर उल्लंघन केल्याचे आढळले. सुनक यांनी त्यांच्या स्वतंत्र सल्लागाराला झाहवी यांच्याविरुद्ध कर फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले, जे गेल्या वर्षी ब्रिटनमधील राजकीय गोंधळाच्या काळात थोडक्यात अर्थमंत्री होते. झाहवी म्हणाले की यूकेच्या कर अधिकार्‍यांनी निर्णय दिला आहे...29 Jan 2023 / No Comment /

तिसरी मात्रा ओमिक्रॉनवर ८८ टक्के प्रभावी

तिसरी मात्रा ओमिक्रॉनवर ८८ टक्के प्रभावीलंडन, २ जानेवारी – लसीची तिसरी बुस्टर मात्रा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनवर ८८ टक्के प्रभावी असल्याचे ब्रिटनमधील नव्या अभ्यासातून समोर आले आहे. या तिसर्‍या मात्रेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता ८८ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. दुसर्‍या मात्रेमुळे मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. मात्र, आता ओमिक्रॉनचाही धोका वाढत असल्याने तिसरी मात्रा या नव्या धोक्यापासूनही संरक्षण देत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. दुसर्‍या मात्रेमुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती सहा ते सात महिन्यांनंतर...3 Jan 2022 / No Comment /

हवामान बदलावरील धोरणात भारताचे मोठे यश

हवामान बदलावरील धोरणात भारताचे मोठे यश‘फेज डाऊन’मध्ये कोळशाचा समावेश, ग्लासगो, १४ नोव्हेंबर – स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान बदलावरील परिषदेत भारताच्या पुढाकाराला मोठे यश मिळाले आहे. सीओपी-२६ या हवामान परिषदेत तयार करण्यात आलेल्या मसुद्यावर जवळपास २०० देशांचे एकमत झाले आहे. १.५ अंश सेल्सियस तापमानाचे लक्ष्य प्राप्त करण्याचा या मसुद्याचा उद्देश आहे. यात कोळशाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचेही म्हटले होते. भारताने याला विरोध दर्शवला होता. यात भारताने महत्त्वाचे बदल करून सर्व देशांना ते पटवून...15 Nov 2021 / No Comment /

ब्रिटनच्या मान्यताप्राप्त यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश

ब्रिटनच्या मान्यताप्राप्त यादीत कोव्हॅक्सिनचा समावेशलंडन, ९ नोव्हेंबर – भारतात विकसित झालेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीचा ब्रिटनने त्यांच्या मान्यताप्राप्त लसींच्या यादीत समावेश केला असून, कोव्हॅक्सिनची लस घेणार्‍या नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. ही लस घेणारी व्यक्ती आता कोणत्याही अडथळ्यांविना ब्रिटनला जाऊ शकणार आहे. इतकेच काय, त्यांना इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर विलगीकरणाची आवश्यकता राहणार नाही. ब्रिटनचा हा नियम २२ नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहे. भारताच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटनने या लसीला प्रतीक्षा यादीतून...9 Nov 2021 / No Comment /

कोरोना प्रतिबंधक गोळीला ब्रिटनची मान्यता

कोरोना प्रतिबंधक गोळीला ब्रिटनची मान्यताअमेरिकेत होणार ३० ला बैठक, लंडन, ५ नोव्हेंबर – औषधनिर्माण क्षेत्रातील कंपनी मर्कच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला ब्रिटनने मंजुरी दिली आहे. हे औषध गोळी स्वरूपात आहे. आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात इंजेक्शन द्यावे लागत होते. त्यामुळे जगातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक गोळीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. अमेरिकेच्या मर्क व रिजबॅक बायोथेराप्यूटिकने संयुक्तपणे हे औषध विकसित केले आहे. ब्रिटनच्या मेडिकल व हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी एमएचआरए मोलोनुपिरावीरच्या वापरास परवानगी दिली असून,...6 Nov 2021 / No Comment /

‘डब्ल्यूएचओ’ची कोव्हॅक्सिनला मान्यता

‘डब्ल्यूएचओ’ची कोव्हॅक्सिनला मान्यताआपत्कालीन स्थितीत होणार वापर, जीनेव्हा, ३ नोव्हेंबर – हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंध क लस कोव्हॅक्सिनला अखेर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मान्यता दिली असून, या लसीचा समावेश आपत्कालीन वापराच्या मंजूर लसींच्या यादीत करण्यात आला आहे. आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीने यापूर्वी लसीच्या जोखीम-फायदा मूल्यांकनाची अतिरिक्त माहिती उत्पादक कंपनी भारत बायोटेककडून मागितली होती. आपत्कालीन वापर यादीवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने ही मान्यता...3 Nov 2021 / No Comment /

इटली दौर्‍यावर पंतप्रधान मोदींनी मराठीत साधला संवाद

इटली दौर्‍यावर पंतप्रधान मोदींनी मराठीत साधला संवादरोम, २९ ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या दौर्‍यावर इटलीत दाखल झाले. आज शुक्रवारी त्यांनी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर भारतीय समुदायाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्‍लोक म्हटले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी इटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत संवाद साधला. एका महिलेने मोदींना ‘केम छो…’म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीत संवाद साधला. माही गुरुजी ऊर्फ महिंद्र सिरसाठ हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे...30 Oct 2021 / No Comment /

चोवीस तासांत होणार कोव्हॅक्सिनबाबत निर्णय

चोवीस तासांत होणार कोव्हॅक्सिनबाबत निर्णयजीनेव्हा, २६ ऑक्टोबर – कोव्हॅक्सिन या भारतीय लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची तांत्रिक सल्लागार समिती डेटाची पडताळणी करीत आहे. हा डेटा समाधानकारक असल्यास या लसीबाबत पुढील चोवीस तासांत शिफारस केली जाईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. हैदराबाद येथील भारत बायोटेकने ही लस विकसित केली असून, आपत्कालीन मंजुरी मिळावी, यासाठी १९ एप्रिल रोजी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज सादर केला आहे. कंपनीने सादर केलेला डेटा समाधानकारक...26 Oct 2021 / No Comment /

कोव्हिशिल्डमुळे ‘डेल्टा’च्या मृत्यूपासून ९० टक्के संरक्षण

कोव्हिशिल्डमुळे ‘डेल्टा’च्या मृत्यूपासून ९० टक्के संरक्षणलंडन, २१ ऑक्टोबर – घातक समजल्या जाणार्‍या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने होणार्‍या मृत्यूपासून कोव्हिशिल्डच्या दोन मात्रा आणि फायझरच्या लसीमुळे ९० टक्के संरक्षण मिळू शकते, असा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासासाठी कोरोनावर नजर ठेवणार्‍या स्कॉटलंड-वाईड ईएव्हीए-२ या मंचाच्या डेटाचा वापर करण्यात आला. डेल्टामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट आढळला आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. एडिनबर्ग...22 Oct 2021 / No Comment /

गीता गोपीनाथ सोडणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पद

गीता गोपीनाथ सोडणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पदलंडन, २० ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ जानेवारीमध्ये राजीनामा देणार आहेत. भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ जानेवारीमध्ये आयएमएफसोबत जोडल्या गेल्या होत्या. यानंतर आता पुन्हा त्या प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात परतत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ही माहिती दिली. आयएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की, हार्वर्डने गीता गोपीनाथ यांची रजा एक वर्षाने वाढवली होती, ज्यामुळे त्यांना तीन वर्षांसाठी आयएमएफमध्ये सेवा करण्याची परवानगी मिळाली. गोपीनाथ या आयएमएफच्या संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत, जे...20 Oct 2021 / No Comment /

स्विस बँकेने भारताला दिली तिसरी यादी

स्विस बँकेने भारताला दिली तिसरी यादी९६ देशांमधील ३३ लाख खात्यांचा समावेश, नवी दिल्ली/बर्न, ११ ऑक्टोबर – स्विस बँकेकडून भारताला तेथील भारतीय बँक खातेधारकांची तिसरी यादी सादर केली आहे. यात ९६ देशांमधील ३३ लाख खात्यांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल कर प्रशासन अर्थात् एफटीएने आज सोमवारी याबाबतची माहिती दिली. दरवर्षी स्विस बँकेकडून भारताला विदेशात काळा पैसा जमा करणार्‍या नागरिकांची यादी दिली जाते. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून ही यादी अलिकडेच भारताकडे सोपवली आहे. यावेळी दहा अतिरिक्त देशांमधील भारतीयांची...11 Oct 2021 / No Comment /