|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.39° C

कमाल तापमान : 32.46° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 5.98 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.46° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.76°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » गीता गोपीनाथ सोडणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पद

गीता गोपीनाथ सोडणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पद

लंडन, २० ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ जानेवारीमध्ये राजीनामा देणार आहेत. भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ जानेवारीमध्ये आयएमएफसोबत जोडल्या गेल्या होत्या. यानंतर आता पुन्हा त्या प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात परतत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ही माहिती दिली.
आयएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की, हार्वर्डने गीता गोपीनाथ यांची रजा एक वर्षाने वाढवली होती, ज्यामुळे त्यांना तीन वर्षांसाठी आयएमएफमध्ये सेवा करण्याची परवानगी मिळाली. गोपीनाथ या आयएमएफच्या संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत, जे जीडीपी वाढीच्या अंदाजासह त्रैमासिक जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवाल तयार करतात.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी गोपीनाथ यांचे कौतुक केले आहे आणि सांगितले की, त्यांनी कोरोना महामारीत महत्त्वपूर्ण विश्‍लेषणाचे काम केले आहे. क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी असेही म्हटले की, गोपीनाथ यांनी आयएमएफच्या सर्वोच्च अर्थतज्ज्ञ म्हणून काम करणार्‍या पहिल्या महिला म्हणून इतिहास घडवला आहे.
४९ वर्षीय गीता गोपीनाथ या आयएमएफमध्ये सामील होण्यापूर्वी हार्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्त्र आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हार्वर्डने गोपीनाथ यांच्या अनुपस्थितीची रजा एक वर्ष वाढवून, तीन वर्षे आयएमएफमध्ये सेवा करण्याची परवानगी दिली होती. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता या आयएमएफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी सांगितले की गीता यांच्या उत्तराधिकारीचा शोध लवकरच सुरू केला जाईल. जॉर्जिएवा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गीता यांचे योगदान खरोखर उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय वित्त आणि मायक्रोइकॉनॉमिक्सच्या त्यांच्या सखोल आकलनाचा आम्हाला खूप फायदा झाला. मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक होत्या.

Posted by : | on : 20 Oct 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g