|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.98° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.28 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.61°C - 31.17°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.36°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.75°C - 29.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 29.74°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.56°C - 30.53°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.67°C - 30.1°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » तिसरी मात्रा ओमिक्रॉनवर ८८ टक्के प्रभावी

तिसरी मात्रा ओमिक्रॉनवर ८८ टक्के प्रभावी

लंडन, २ जानेवारी – लसीची तिसरी बुस्टर मात्रा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनवर ८८ टक्के प्रभावी असल्याचे ब्रिटनमधील नव्या अभ्यासातून समोर आले आहे. या तिसर्‍या मात्रेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता ८८ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
दुसर्‍या मात्रेमुळे मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. मात्र, आता ओमिक्रॉनचाही धोका वाढत असल्याने तिसरी मात्रा या नव्या धोक्यापासूनही संरक्षण देत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
दुसर्‍या मात्रेमुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती सहा ते सात महिन्यांनंतर कमी होते. नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी ती आणखी वाढविण्याकरिता तिसरी मात्रा आवश्यक झाली असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
अलिकडेच हा अभ्यास सार्वजनिक करण्यात आला. याबाबत माहिती देताना डॉ. एरिक टोपोल म्हणाले की, दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा ते सात महिन्यांमध्ये लसीचा प्रभाव ५२ टक्क्यांपर्यंत कमी होतो. त्यामुळे इतक्या प्रमाणातील रोगप्रतिकारशक्ती ओमिक्रॉनचा सामना करण्यास पुरेशी ठरू शकत नाही. ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तिसर्‍या मात्रेची गरज आहे.
तिसरी मात्रा किंवा बुस्टर मात्रा शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे आणि कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रभावी सामना करण्याचे काम करीत असते. तिसरी मात्रा घेणार्‍यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतरही त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही तसेच मृत्यूचा धोकाही बराच कमी होत असतो, असे डॉक्टर एरिक यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Jan 2022
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g