|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.35° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 2.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.76°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत ‘देश’, ‘बिंदास’ शब्दांचा समावेश

ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत ‘देश’, ‘बिंदास’ शब्दांचा समावेश

-भारतीय इंग्रजीशी संबंधित ८०० पेक्षा जास्त नोंदी,
लंडन, (३१ जानेवारी) – ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये(ओईडी) ‘देश’ आणि ‘बिंदास’ यासारख्या शब्दांसह भारतीय इंग्रजीशी संबंधित ८०० पेक्षा जास्त नोंदींचे उच्चार, प्रतिलेखन आणि ऑडिओ आता उपलब्ध आहेत.
भारतीय इंग्रजीने ओईडीच्या उच्चारांमध्ये आणि जागतिक इंग्रजी उच्चारण ऑडिओ आर्काइव्हमध्ये अलिकडेच समाविष्ट केल्याने देशातील १३० दशलक्ष भारतीय इंग्रजी भाषिकांसाठी मोठी पोकळी भरून आली आहे, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसने सांगितले. जेव्हापासून आम्ही ब्रिटिश आणि अमेरिकी इंग्रजी व्यतिरिक्त इंग्रजीच्या विविध प्रकारच्या उच्चारांच्या ऑडिओचा विस्तार आणि समावेश करण्याचे काम सुरू केले, तेव्हापासून भारतीय इंग्रजी ही आमची सर्वांत मोठी प्राथमिकता आहे आणि आमच्या सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे, असे ओईडीचे उच्चारण संपादक डॉ. कॅथरिन सँगस्टर यांनी सांगितले. यातील जटीलता कमी करण्यासाठी आम्ही याचे प्रतिलेखन मॉडेल विकसित केले असल्याचा मला आनंद आहे आणि आता ओईडीमध्ये इंग्रजीच्या या अत्यंत महत्त्वाच्या विविधतेसाठी उच्चार देऊ शकतो, असे सँगस्टर यांनी सांगितले.
दिया, बच्चा, अलमिरा…
डिक्शनरीत समावेश झालेल्या इतर भारतीय शब्दांमध्ये ‘दिया’, ‘बच्चा’ आणि ‘अलमिरा’चा समावेश आहे. जगभरातील इंग्रजी भाषेच्या असलेल्या विविध छटांवर ओईडीने २०१६ पासून लक्ष केंद्रित केले असून, उच्चारणांचा संग्रह वाढवला जात आहे. विशिष्ट प्रदेशांत वापरल्या जाणार्या शब्दांसाठी संपूर्ण डिक्शनरीत मानक म्हणून दिलेल्या ब्रिटिश-अमेरिकन उच्चारांसह अर्थ देण्यात आला आहे.

Posted by : | on : 31 Jan 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g