|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.35° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 2.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.83°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ‘डब्ल्यूएचओ’ची कोव्हॅक्सिनला मान्यता

‘डब्ल्यूएचओ’ची कोव्हॅक्सिनला मान्यता

आपत्कालीन स्थितीत होणार वापर,
जीनेव्हा, ३ नोव्हेंबर – हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंध क लस कोव्हॅक्सिनला अखेर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मान्यता दिली असून, या लसीचा समावेश आपत्कालीन वापराच्या मंजूर लसींच्या यादीत करण्यात आला आहे.
आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीने यापूर्वी लसीच्या जोखीम-फायदा मूल्यांकनाची अतिरिक्त माहिती उत्पादक कंपनी भारत बायोटेककडून मागितली होती.
आपत्कालीन वापर यादीवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने ही मान्यता दिली आहे. तांत्रिक सल्लागार समिती ही एक स्वतंत्र समिती असून, जगभरातील लसींचा समावेश आपत्कालीन लसींच्या यादीत करायचा अथवा नाही, याबाबतचा सल्ला ही समिती जागतिक आरोग्य संघटनेला देते.
लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी आढळली आहे, तर डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात या लसीतून ६५.२ टक्के संरक्षण मिळते. हा निष्कर्ष तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचे विश्‍लेषण करून काढण्यात आला, अशी माहिती भारत बायोटेकने दिली. देशातील लसीकरण मोहिमेत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि अस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड या दोन लसींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
कोव्हॅक्सिनची शेल्फ लाईफ १२ महिने
कोव्हॅक्सिनची शेल्फ लाईफ वाढवून ती उत्पादन तारखेपासून १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यास केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) मंजुरी दिली, अशी माहिती भारत बायोटेकने ट्विट करीत दिली. म्हणजेच, या लसीचा वापर उत्पादन झाल्यापासून एक वर्ष करणे शक्य होणार आहे.

Posted by : | on : 3 Nov 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g