|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 51 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear

ब्रिटनमध्ये फायझरवर सायबर हल्ला

ब्रिटनमध्ये फायझरवर सायबर हल्लालंडन, १० डिसेंबर – जगभरात कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी लस बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही कंपन्या ही लस बनविण्यात यशस्वी झाल्या असून ब्रिटनने आपत्कालीन लसीकरणही सुरू केले आहे. फायझर व बायोएनटेकने ब्रिटनमध्ये ज्या सरकारी संस्थेला कोरोना लसीसाठी मंजुरी अर्ज पाठविला होता, तिथे सायबर हल्ला झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या संस्थेतून हॅकर्सनी कोरोना लसीसंदर्भात गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे. लसीसंदर्भातच्या दस्तावेजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांचा प्रयत्न फसला आहे,...10 Dec 2020 / No Comment /

ऑक्सफर्ड लस सुरक्षित, प्रभावी असल्याचा दावा

ऑक्सफर्ड लस सुरक्षित, प्रभावी असल्याचा दावास्वस्त दरात उपलब्ध होणार, लंडन, ९ डिसेंबर – ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने विकसित केलेल्या लशीच्या चाचणीचे अंतिम निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले असून, ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या थैमानाने हतबल झालेल्या जगासाठी, मुख्यत्वे भारतासाठीही दिलासादायक बातमी समोर आली आहे. द लॅसेन्ट या नियतकालिकामध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दोन पूर्ण डोस दिल्यानंतर लस ६२ टक्के प्रभावी आहे. तर, प्रारंभी अर्धा डोस आणि नंतर पूर्ण डोस दिल्यानंतर ही लस ९०...9 Dec 2020 / No Comment /

ब्रिटनमध्ये पहिल्यांदा लस मिळणार्‍यांत भारतीयाचा समावेश

ब्रिटनमध्ये पहिल्यांदा लस मिळणार्‍यांत भारतीयाचा समावेशपंतप्रधानांनी दिली ऐतिहासिक दिवसाची उपमा, लंडन, ८ डिसेंबर – ब्रिटनमध्ये आज, मंगळवारपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, पहिल्यांदाच लस घेणार्‍या काही मोजक्या लोकांमध्ये ८७ वर्षीय भारतीय वंशाचे हरी शुक्ला यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या देशात लस घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. माहितीनुसार, मागील आठवड्यात ब्रिटनने फायझर कंपनीच्या लशीला मंजुरी देत सर्वांसाठी लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली होती. आता सर्व चाचण्या पार पाडल्यानंतर...8 Dec 2020 / No Comment /

ब्रिटनमध्ये सप्टेंबरपासून हुआवेईच्या किटवर बंदी

ब्रिटनमध्ये सप्टेंबरपासून हुआवेईच्या किटवर बंदीलंडन, ३० नोव्हेंबर – हुआवेईची नवी किट सप्टेंबर २०२१ पासून कोणत्याही दूरसंचार कंपनीने वापरू नये, असा आदेश ब्रिटिश सरकारने आज सोमवारी दिला आहे. उच्च गतीच्या मोबाईल नेटवर्कमधून चिनी उपकरण कंपन्यांना बाहेर काढण्याच्या हेतूने ब्रिटन सरकारने हे पाऊल उचलले आहे. सन २०२७ च्या अखेरीपर्यंत हुआवेईची ५-जी नेटवर्कमधून काढण्याचा आदेश यापूर्वीच ब्रिटन सरकारने दिला आहे, हे विशेष. ही कंपनी सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट करीत अमेरिकेने या कंपनीवर प्रतिबंध लादले असून, आपल्या सहकारी...30 Nov 2020 / No Comment /

चिनी तंत्रज्ञान कंपन्या ठरू शकतात धोकादायक

चिनी तंत्रज्ञान कंपन्या ठरू शकतात धोकादायकपॅरिस, २२ नोव्हेंबर – चीनमधील ऍन्ट समूहाने ‘आयपीओ’ थंडबस्त्यात टाकला असला, तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील चिनी दिग्गज कंपन्या धोकादायक ठरू शकतात, अशी चिंता युरोपियन बँकांना सतावत आहे. अलिकडच्या काही वर्षांत युरोपमधील वित्त क्षेत्रात फिनटेक या स्टार्टअपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या स्टार्टअपद्वारे दिल्या जाणार्‍या डिजिटल सेवांमुळे बँकांना अडचण उद्भवली आहे. यामुळे बँकांना अद्याप मोठा धोका निर्माण झाला नसला, तरी अशाच प्रकारच्या डिजिटल सेवा देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत...22 Nov 2020 / No Comment /

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन द्या

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन द्याआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आवाहन, वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे तरलतेच्या सापळ्यात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री गीता गोपीनाथ यांनी धोरणकर्त्यांना केले आहे. जागतिक पातळीवरील ९७ टक्के प्रगत अर्थव्यवस्थांसह ६० टक्के अर्थव्यवस्थांच्या केंद्रीय बँकांनी धोरणात्मक व्याजदर १ टक्क्यापेक्षा कमी ठेवले आहे. जगातील एकपंचमांश अर्थव्यवस्थांचा दर उणे झाला आहे, असे गोपीनाथ यांनी फायनान्शियल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. आणखी एक धक्का बसल्यास केंद्रीय बँकांकडे व्याजदर...4 Nov 2020 / No Comment /

फ्रान्सचा हवाईहल्ला, ५० अतिरेकी ठार

फ्रान्सचा हवाईहल्ला, ५० अतिरेकी ठारअल्-कायदाला मोठा दणका, ५ अतिरेक्यांना जिवंत पकडले, बामाको (माली), ३ नोव्हेंबर – माली देशाच्या मध्यवर्ती भागात फ्रेंच वायुदलाने केलेल्या हवाईहल्ल्यात अल्-कायदाचे ५० अतिरेकी ठार झाल्याची माहिती फ्रान्स सरकारने आज सोमवारी दिली. मुस्लिम दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू असलेल्या माली देशात, बुर्किना फासो आणि नायजेरिया या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात त्या भागाजवळ शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी दिली. या कारवाईत चार...4 Nov 2020 / No Comment /

खोटी माहिती पसरवणार्‍या पोस्टवर फेसबुक करणार कारवाई

खोटी माहिती पसरवणार्‍या पोस्टवर फेसबुक करणार कारवाईऑकलंड, २८ जून – फेसबुकवरील द्वेषयुक्त भाषणे व समाजामध्ये फूट पाडण्यार्‍या पोस्ट वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी फेसबुकवर बहिष्कार टाकला आहे. या कंपन्यांच्या बहिष्कारामुळे फेसबुकच्या शेअरची किंमत आठ टक्क्यांनी घसरली असून, कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ५० अब्ज डॉलर्सनी घसरले आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या पोस्टवर इशारा देणारे झेंड्याचे चिन्ह लावणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवरून या वादाला सुरुवात झाली होती. अध्यक्षपदाच्या मेल-इन मतदानातून घोटाळा होईल, असे भाकीत...28 Jun 2020 / No Comment /

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदान

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदानलंडन, २ एप्रिल – युरोपियन युनियनसोबत केलेला करार तीन वेळा नाकारणार्‍या ब्रिटिश खासदारांनी ब्रेक्झिटच्या चार संभाव्य पर्यायी योजनांच्या विरोधात आज मंगळवारी मतदान केले आहे. युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यावर त्यासोबत आर्थिक संबंध कायम ठेवण्यासाठी प्रस्तावित पर्यायानुसार दुसर्‍यांदा सार्वमत घेण्यासाठी किंवा ब्रेक्झिट रोखण्यासाठी बहुमत प्राप्त करण्यास ब्रिटिश संसद अपयशी ठरली आहे. दुसर्‍या सार्वमतादरम्यान प्रस्तावाच्या बाजूने सर्वाधिक २८० मते प्राप्त झाली. मात्र, प्रस्तावाविरोधात २९२ मते पडली आहेत. युरोपियन युनियनसोबत कायम ठेवण्याचा सर्वाधिक मते...3 Apr 2019 / No Comment /

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध= स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] – रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ब्रिटिशचे जे. फ्रासेर स्टॉडर्ट आणि नेदरर्लंडचे बर्नार्ड फेरिंगा या वैज्ञानिकांना आज बुधवारी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. नियंत्रित राहील अशा पद्धतीने रेणुंची रचना आणि संश्‍लेषणाची महत्त्वाची कामगिरी या तीन वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला असून, ९ लाख ३० हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप...7 Oct 2016 / No Comment /

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेलस्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्‍या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही वैज्ञानिकांनी आपल्या अभूतपूर्व अभ्यासासाठी अतिशय प्रगत अशा गणितीय पद्धतीचा वापर केला. यासाठी त्यांनी सुपरकंडक्टर, सुपरफ्ल्युड्‌स किंवा पातळ मॅग्नेटिक फिल्म्‌चा वापर केला. या कार्यासाठी संपूर्ण जग त्यांचे आभारी...6 Oct 2016 / No Comment /