|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.76° C

कमाल तापमान : 33.25° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 59 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.25° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.44°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.2°C - 30.98°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.84°C - 31.52°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.09°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.67°C - 30.85°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.28°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » चिनी तंत्रज्ञान कंपन्या ठरू शकतात धोकादायक

चिनी तंत्रज्ञान कंपन्या ठरू शकतात धोकादायक

पॅरिस, २२ नोव्हेंबर – चीनमधील ऍन्ट समूहाने ‘आयपीओ’ थंडबस्त्यात टाकला असला, तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील चिनी दिग्गज कंपन्या धोकादायक ठरू शकतात, अशी चिंता युरोपियन बँकांना सतावत आहे.
अलिकडच्या काही वर्षांत युरोपमधील वित्त क्षेत्रात फिनटेक या स्टार्टअपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या स्टार्टअपद्वारे दिल्या जाणार्‍या डिजिटल सेवांमुळे बँकांना अडचण उद्भवली आहे. यामुळे बँकांना अद्याप मोठा धोका निर्माण झाला नसला, तरी अशाच प्रकारच्या डिजिटल सेवा देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत आहे.
नजिकच्या काळात ऍन्ट समूह आमच्यासाठी मोठा स्पर्धक म्हणून समोर येणार आहे. या समूहात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, असे फ्रान्स सोसायटी जनरल बँकेचे प्रमुख फ्रेड्रिक औडिया यांनी सांगितले.
तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकी कंपन्यांनी अलिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असली, तरी त्यांचे चिनी प्रतिस्पर्धी गुंतवणुकीत त्यांच्या समोर आहेत.
बाजारात आयपीओ आणून ३४ अब्ज डॉलर्स उभारण्याची ऍन्ट समूहाची योजना होती. मात्र, चिनी सरकारच्या निर्णयामुळे हा आयपीओ तूर्तास टळला आहे. या समूहाची मुख्य कंपनी अलीपे चीनमधील रोख हस्तांतरणातील एक मोठी कंपनी आहे. बहुतांश चिनी नागरिकांकडून या मंचाचा वापर केला जातो. वुई चॅट पे या कंपनीची मुख्य स्पर्धक असून, याची मालकी टेनसेन्ट या कंपनीकडे आहे.
संदेशवहनाचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे या कंपन्यांचे मूळ काम आहे. मात्र, या कंपन्या लोकांना रोज कामात येणार्‍या रोख हस्तांतरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत, असे अर्न्स्ट ऍण्ड यंग या फिनटेक कंपनीतील तज्ज्ञ ख्रिस्तोफर श्मिट्‌झ यांनी सांगितले. हळूहळू लोकांच्या खर्चाचा मोठा वाढणारा वाटा या कंपन्यांकडे जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिनी लोकांनी त्यांच्या सुविधेसाठी अलीपे किंवा वुई चॅट पेचा वापर करून स्मार्टफोनवरील विक्रेत्यांचे क्यूआर कोडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशांचे हस्तांतरण सुरू केले आहे. अलीपे या कंपनीचे ७३.१ कोटी वापरकर्ते आहेत. चीनमध्ये कधीकाळी रोखीनेच व्यवहार व्हायचे. मात्र, या कंपन्यांनी काही वर्षांतच लोकांची सवय बदलली आणि त्यांच्या हातातील स्मार्टफोनचा वापर रोख हस्तांतरणासाठी करीत आहेत.

Posted by : | on : 22 Nov 2020
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g