|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.99° C

कमाल तापमान : 30.17° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.17°C - 30.5°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

28.94°C - 30.35°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.02°C - 30.82°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.93°C - 30.11°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.89°C - 30.04°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.11°C - 29.97°C

broken clouds
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » फ्रान्सचा हवाईहल्ला, ५० अतिरेकी ठार

फ्रान्सचा हवाईहल्ला, ५० अतिरेकी ठार

अल्-कायदाला मोठा दणका, ५ अतिरेक्यांना जिवंत पकडले,

बामाको (माली), ३ नोव्हेंबर – माली देशाच्या मध्यवर्ती भागात फ्रेंच वायुदलाने केलेल्या हवाईहल्ल्यात अल्-कायदाचे ५० अतिरेकी ठार झाल्याची माहिती फ्रान्स सरकारने आज सोमवारी दिली. मुस्लिम दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू असलेल्या माली देशात, बुर्किना फासो आणि नायजेरिया या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात त्या भागाजवळ शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी दिली. या कारवाईत चार अतिरेक्यांना जिवंत पकडण्यात आले आहे.
माली येथे बारखान मोहिमेंतर्गत ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अल्-कायदाचे ५० अतिरेकी ठार झाले आणि यावेळी शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले, असे पार्ले यांनी सांगितले. मालीतील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी फ्रान्सने १ ऑगस्ट २०१४ पासून बारखान मोहीम हाती घेतली आहे.
३० दुचाक्याही नष्ट झाल्या.
बामाको येथे रवाना होण्यापूर्वी पार्ले यांनी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष महामादौ इस्सोफौ आणि नायजेरियन समकक्ष इसाउफौ कटाम्बे यांच्यासोबत चर्चा केली. तीन देशांच्या सीमा एकत्र येत असलेल्या भागात दुचाकीस्वारांचा मोठा ताफा गस्त घालणार्‍या ड्रोनला आढळल्यानंतर हा हवाईहल्ला करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली. ड्रोनला हुलकावणी देण्यासाठी दुचाकीस्वार वृक्षाखाली लपले. त्यानंतर फ्रेंच वायुदलाची दोन मिराज विमाने पाठवण्यात आली. त्यांनी क्षेपणास्त्रहल्ला करून दहशतवाद्यांचा खातमा केला, असे पार्ले यांनी सांगितले. घटनास्थळावर स्फोटके आणि आत्मघाती हल्ल्यासाठी वापरले जाणारे जॅकेट्‌स आढळले. अतिरेक्यांचे हे पथक या भागातील एका लष्करी ठिकाणावर हल्ला करण्यासाठी जात होते, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ग्रेटर सहारामध्ये इसिसच्या विरोधात आणखी एक मोहीम सुरू करण्यात आली असून, तिथे ३ हजार सैनिक तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेतील यशाची माहिती येत्या काही दिवसां दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्सारुल इस्लाम संघटना उद्ध्वस्त
या कारवाईत अन्सारुल इस्लाम संघटना उद्ध्वस्त करण्यात आली. ही संघटना इयाद अग घालीच्या नेतृत्वातील एसआयएम आघाडीच्या माध्यमातून अल्-कायदासोबत जुळली आहे, असे पार्ले यांनी सांगितले. अल्-कायदाचा मालीतील कमांडर अब्देलमालेक ड्रॉकडेल याचा फ्रान्सच्या लष्कराने जूनमध्ये खातमा केल्यानंतर घाले हा साहेल येथील सर्वांत मोठा जिहादी नेता झाला आहे.

Posted by : | on : 4 Nov 2020
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g