किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.74° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.74° से.
22.37°से. - 25.6°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
बुधवार, 15 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल25.3°से. - 27.1°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आवाहन,
वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे तरलतेच्या सापळ्यात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री गीता गोपीनाथ यांनी धोरणकर्त्यांना केले आहे.
जागतिक पातळीवरील ९७ टक्के प्रगत अर्थव्यवस्थांसह ६० टक्के अर्थव्यवस्थांच्या केंद्रीय बँकांनी धोरणात्मक व्याजदर १ टक्क्यापेक्षा कमी ठेवले आहे. जगातील एकपंचमांश अर्थव्यवस्थांचा दर उणे झाला आहे, असे गोपीनाथ यांनी फायनान्शियल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. आणखी एक धक्का बसल्यास केंद्रीय बँकांकडे व्याजदर कमी करण्यासाठी जागा होईल, असेही त्यांनी या लेखात म्हटल्याचे वृत्त शिनहुआने दिले आहे.
जागतिक अर्थव्यवस्था तरलतेच्या सापळ्यात अडकली असल्याने आर्थिक धोरणांचा मर्यादित प्रभाव पडेल, असा अटळ निष्कर्ष निघत आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पतधोरणांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणे आवश्यक अल्याचेही त्यांनी सांगितले.
वस्तूंचा उपभोग वाढवण्यासाठी तसेच वैद्यकीय सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी तसेच डिजिटल पायाभूत आणि पर्यावरण रक्षणासाठी रोख हस्तांतरणाच्या माध्यमातून वित्तीय प्राधिकारी मागणी वाढवू शकतात, असेही गोपीनाथ यांनी सुचवले आहे.
या खर्चांमुळे रोजगारनिर्मिती होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि सशक्त अर्थव्यवस्थेसाठी या माध्यमातून पायाभरणी करणे शक्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गुंतवणुकीतील वाढीमुळे आर्थिक विकासात दिले जाणारे योगदान मोठ्या प्रमाणात वाढल्याने तरलतेच्या सापळ्याचा विस्तार झाला. त्यामुळे दिले जाणारे प्रोत्साहन कदाचित कधीच मोठे ठरू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पतधोरण हे या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे आणि भविष्यातही राहील. मात्र, सध्या जग तरलतेच्या सापळ्यात अडकले आहे. जागतिक पातळीवर एकत्रितपणे अर्थव्यवस्थेला धक्का देण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी या लेखात स्पष्ट केले आहे.