|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.21°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदानाची शक्यता

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदानाची शक्यता

वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमॉक्रॅटचे उमेदवार जो बिडेन यांनी कडवे आव्हान दिले आहे. मतदानानंतर लगेच निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार नसल्याने, ट्रम्प सत्ता कायम राखतात की बिडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेतात, याचे उत्तर थोड्या विलंबानेच मिळणार आहे.
आज सकाळी पहिल्या काही तासांमध्येच सुमारे दहा कोटी मतदारांनी मताधिकार बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर लांबचलांब रांगा होत्या. त्यामुळे यावेळचे मतदान विक्रमी ठरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सुमारे २३ कोटी मतदार या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र आहेत.
विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या अमेरिकन नागरिकांनी आभासी मतदान केले. त्यांच्या मतपत्रिका प्राप्त होण्यास विलंब लागणार आहे. यासाठी काही दिवस विलंब होऊ शकतो.
भारतीय अमेरिकन नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख असून, यातील अडीच २५ लाख नागरिक मतदानासाठी पात्र आहेत. ट्रम्प आणि बिडेन यांच्यात खरी लढत टेक्सास, मिशिगन, फ्लोरिडा, व्हिस्कॉन्सिन आणि पेन्सिल्वेनिया या प्रांतांमध्ये असून, तिथे भारतीय मतदारांची संख्या १३ लाखांच्या घरात आहे.
व्हाईट हाऊसला किल्ल्याचे स्वरूप
निवडणुकीच्या काळात हिंसाचार उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, व्हाईट हाऊसला कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आली आहे. यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या या निवासस्थानाला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. व्हाईट हाऊसकडे येणार्‍या सर्व मार्गांवर सुरक्षा कठडे टाकण्यात आले असून, सामान्यांसाठी हा मार्ग प्रवेशासाठी बंद करण्यात आला आहे.

Posted by : | on : 4 Nov 2020
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g