किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलऑकलंड, २८ जून – फेसबुकवरील द्वेषयुक्त भाषणे व समाजामध्ये फूट पाडण्यार्या पोस्ट वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी फेसबुकवर बहिष्कार टाकला आहे. या कंपन्यांच्या बहिष्कारामुळे फेसबुकच्या शेअरची किंमत आठ टक्क्यांनी घसरली असून, कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ५० अब्ज डॉलर्सनी घसरले आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या पोस्टवर इशारा देणारे झेंड्याचे चिन्ह लावणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवरून या वादाला सुरुवात झाली होती. अध्यक्षपदाच्या मेल-इन मतदानातून घोटाळा होईल, असे भाकीत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी या प्रकरणात ट्रम्प यांच्या पोस्टवर कोणतीही कारवाई केली नव्हती. या घडामोडींनंतर फेसबुकने धोरणांमध्ये बदल केला असून, झुकेरबर्ग यांनी याविषयी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये नव्या बदलांची माहिती दिली आहे. ‘आपल्या देशासमोर असणार्या आव्हानांच्या वास्तवाकडे लक्ष देण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. निवडणुकीच्या संबंधित खोटी माहिती रोखण्यासाठी फेसबुक अतिरिक्त काळजी घेत आहे.’
आगामी निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर खोटी माहिती पसरविण्यामध्ये फेसबुकची भूमिका किती महत्त्वाची ठरवू शकते, हीच गोष्ट या बदलांमधून अधोरेखित होते, याकडे मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक इथन झुकरमन यांनी म्हटले आहे.
फेसबुकवर केलेले बदल
अमेरिकेतील निवडणूक लक्षात घेऊन फेसबुकवर काही बदल करण्यात आले आहेत. यात मतदानाशी संबंधित सर्व पोस्टवर नवे चिन्ह येणार असून, यातून यूझरना थेट स्थानिक किंवा राज्य पातळीवरील प्रशासनाशी जोडण्यात येईल.
मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणार्या खोट्या माहितीच्या पोस्टवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतील मतदानाच्या ७२ तास आधी स्थानिक मतदान केंद्रांविषयी खोटी माहिती सांगणार्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येईल. अशा पोस्ट तातडीने काढून टाकण्यात येतील.