किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलएस. जयशंकर यांचे प्रतिपादन,
वॉशिंग्टन, ३ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करून योग्य उपाययोजना करण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा देश कलम ३७० निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला आव्हान देईल, या निर्णयात अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, याची अपेक्षा भारताला होती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
५ ऑगस्ट रोजी कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर येथे तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलांनी मोठा संयम ठेवला आहे, असे त्यांनी अमेरिकी विचारवंतांच्या ‘हेरिटेज फाऊंडेशन’द्वारे आयोजित कार्यक्रमात सांगितले. मागील काही दशकांमध्ये केलेली कृत्ये पाकिस्तान सुरूच ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून तुम्ही कोणती अपेक्षा करू शकता, असा प्रश्न उपस्थित करताना, काश्मीर खोर्यात शांतता आणि आनंद परतण्याची अपेक्षा आम्हाला असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनसोबत द्विपक्षीय चर्चा करणार
भारताला चीनसोबत सौहार्दपूर्ण आणि निरंतर प्रगती करणारे संबंध हवे आहेत. ५-जी सारख्या चीनला भेडसावणार्या मुद्यांवरही आम्हाला द्विपक्षीय विचारधाराच स्वीकारायची आहे, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
पॉम्पिओंसोबत चर्चा
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पिओंसोबत एस. जयशंकर यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये उभय नेत्यांनी भारत-अमेरिकेतील बळकट होत असलेले द्विपक्षीय संबंध, काश्मिरातील विकास आणि समान हिताच्या जागतिक मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली. जयशंकर आणि पॉम्पिओ यांची अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मुख्यालय ‘फॉगी बॉटम’ येथे चर्चा झाली. या चर्चेची माहिती कार्यालयाने दोन दिवसांनंतर दिली.
भारत नैर्ऋत्य महाशक्ती होणार
जागतिक पातळीवर भारत झपाट्याने एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येत आहे आणि हा देश कोणत्या दिशेने झुकेल याचा अंदाज तज्ज्ञ आणि विश्लेषक घेत आहेत. पाश्चात्त्य आणि विकसित राष्ट्रांचा दुवा, तसेच नैर्ऋत्य महाशक्ती म्हणून भारताचा उदय होईल, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.